12:16am | Oct 07, 2018 |
कराड : महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे राज्याच्या प्रत्येक मतदारसंघात भरीव काम आहे. त्यामुळे ते राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिलेतर त्यांचे स्वागतच होईल. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक व्यक्त केल्यास त्यांच्यासाठी एका पायावर हा मतदारसंघ सोडण्यास तयार असल्याचे विठ्ठल रूक्मिणी मंदीरे देवस्थानचे अध्यक्ष व भाजपाचे राज्य सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, मलकापूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष व सत्ताही भाजपाचीच असणार असल्याचा दावा डॉ. भोसले यांनी यावेळी केला. यावेळी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, य. मो. कृष्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप उपस्थित होते.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री व ज्यांनी ३५ वर्ष आमदार की केली या दोघांना एकत्र येऊन माझ्या विरोधात लढावे लागते. हा भारतीय जनता पक्षाचा विजय आहे. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसह आणि कोणाकोणाला एकत्र यावे लागत आहे हे मतदारसंघ पाहत आहे. त्यामुळे सर्व विरूध्द एक अशी लढाई या मतदारसंघात झाल्याशिवाय आम्हाला थांबवू शकत नाहीत, असे सध्याचे चित्र आहे. आजपर्यंत जे आम्हाला स्पर्धेतच नाही असे म्हणत होते ते लोक आता आम्हाला प्रमुख शत्रु मानत आहेत किंबहुना आम्हाला थांबवण्यासाठी त्यांना एवढा आठापिठा करावा लागत आहे. हा कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजपाचा चढता आलेख आहे.
ते म्हणाले, ज्यापध्दतीने चंद्रकांतदादांनी राज्यात काम केले आहे. निधीची कमतरता असतानाही त्यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे. त्यासाठी योग्य नियोजन व योजना आणल्या. सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागातील कामात पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे महसुलमंत्री चंद्रकांतदादा राज्यातील कोणत्याही मतदार संघातून उभे राहिले तरी त्यांचे स्वागतच होईल. त्यामुळे आमचा काही विषय येत नाही. आम्ही तर केंव्हाही त्यांच्यासाठी मतदारसंघ सोडण्यासाठी एक पायावर तयार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
मलकापूरच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच नगराध्यक्ष होणार आहे. तर सत्ताही भाजपाची असणार यात शंका नाही, असे सांगत डॉ. भोसले यांनी लोकशाहीत विचार बदलत असतात असे सांगत नगरपालिका होण्याला आपला व कार्यकत्र्यांचा विरोध होता, या प्रश्नाला बगल दिली. मात्र चांगल्या विकासासाठी भुमिका बदलली यात काही वाईट नसल्याचेही त्यांनी अवर्जुन सांगितले. उलट आमचीच पहिल्यापासून नगरपालिकेची मागणी होती. कोणावर अन्याय करता पालिका व्हावी, अशी आमची भुमिका होती व आहे.
पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक
स्वाईन फ्लू व अन्य साथीच्या आजाराचे अनेक रूग्ण कराड तालुक्यात अढळत आहेत. यासाठी स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. जोपर्यंत आपण स्वच्छतेला प्राधान्य देत नाही तोपर्यंत साथीच्या आजारावर कंट्रोल येणे अवघड आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी. कृष्णा हॉस्पीटमध्ये आतापर्यंत ६५ रूग्ण स्वाईन फ्लूचे ॲडमिट झाले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही गोष्ट प्रशासनाने गांर्भियाने घेतली आहे. आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्याच्या अध्यक्ष ते खाली लवकरच बैठक घेतली जाणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |