कराड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, ओंड यांच्या संयुक्तविद्यमाने कराड येथे आयोजित महिलांसाठी कायदे व अधिकाराबाबत जागरुकता विषयी एकदिवशी कार्यशाळेत महिलांनी महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांसह आपल्या अधिकाराविषयी मार्गदर्शन घेतले.
कराड येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, ओंड यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित महिलांसाठी कायदे व अधिकाराबाबत जागरूकता कार्यशाळेचे उद्घाटन कराड पंचायत समितीच्या सभापती सौ.फरिदा इनामदार यांच्याहस्ते झाले. या कार्यशाळेसाठी सातारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी अतिश शिंदे, राज्य महिला आयोगाचे समन्वयक आनंदा शिंदे, अॅड.मनिषा बर्गे, महिला संरक्षण सहाय्यक अधिकारी सविता पवार, कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्नील लोखंडे, कराड शहर निर्भया पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण, आनंदा थोरात, महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियानाचे कराड तालुका समन्वयक निलेश पवार, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानाचे कराड शहर तांत्रिक तज्ञ गणेश जाधव, महिला अर्थिक विकास महामंडळाच्या क्षेत्रीय समन्वयक अनिता सुतार, प्रकाश हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी धनंजय धामणे यांची उपस्थिती होती.
महिलांनी स्वतःमधील क्षमतांचा वापर करून आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. तरीही ग्रामीण भागात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यांनी निर्भय बनावे, अन्याय, अत्याचाराविरोधात दाद मागावी. कायदेविषयक मार्गदर्शन घ्यावे, असा मोलाचा सल्ला सभापती सौ.फरिदा इनामदार यांनी दिला.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी महिलांसाठी असलेले कायदे आणि योजनांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या, महिला व बालकांच्या संरक्षणासाठी शासनाच्या वतीने विविध कायदे तयार करण्यात आले आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र तसेच राज्य शासन विशेष प्रयत्न करीत आहे. महिला व बालकांच्या संरक्षणासाठी शासनाने अत्यंत कठोर कायदे तयार केले असून ते सक्षम असल्याने त्याचा वापर करावा.
संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांनी प्रास्ताविकात महिलांसाठी कायदे व अधिकार कार्यशाळा आयोजनाचा हेतू सांगितला. कार्यशाळेच्या शेवटी सहभागी सर्व महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. मृणाल गरुड, रती भिसे, सुवर्णा सुर्वे, अवधुत माने यांनी स्वागत केले. स्नेहल राजहंस व स्वाती खडंग यांनी सुत्रसंचालन केले. अर्चना पाटील यांनी आभार मानले. कार्यशाळेस संरक्षण अधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थिनी व महिला उपस्थित होत्या.
महिला आयोग व ज्ञानदीप संस्थेला महिलांकडून धन्यवाद
कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ अधिनियम 2013, पी.सी.पी.एन.डी.टी. 1994, हिंदू वारसा हक्क, सायबर क्राईम अधिनियम 2015, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, पोक्सो कायदा, तिहेरी तलाक इत्यादीसह भारतीय दंड संहिता अतर्गंत महिलांविषयक असणारे कलमे जसे विवाहर संबंधीत कलमे 493, 494, 495, 496, 498 (अ), 354, 376, 504, 506, 509 इत्यादी कलामांची माहिती या दिवसभराच्या कार्यशाळेत विविध मान्यवर तज्ञांकडून मिळाली. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेला कार्यशाळा आयोजनामुळे महिला संबधीत असलेल्या विविध कायद्यांची माहिती मिळाल्याचे मत मांडत महिला आयोग व ज्ञानदीप संस्थेला धन्यवाद दिले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |