01:11am | Jan 17, 2020 |
सातारा : तांदूळवाडी येथे झालेल्या वादाच्या कारणातून प्रमोद मतकर यांच्यावर महिलेने धारदार शस्त्राने हल्ला करुन जखमी केल्याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयात महिलेला शिक्षा ठोठावण्यात आली. दिपाली विकास जाधव (वय 31, रा.तांदूळवाडी) असे त्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, चार वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 10 जानेवारी 2017 रोजी ही घटना घडली आहे. याप्रकरणी जखमी प्रमोद मतकर यांचे वडील किसन मतकर यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. 10 जानेवारी रोजी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दिपाली जाधव व प्रमोद मतकर यांच्यामध्ये शेतात जोरदार वादावादी झाली. या वादावादीतून दिपाली जाधव यांनी धारदार शस्त्राने प्रमोद मतकर यांच्यावर हल्ला चढवला. हातावर व डोक्यावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना सातारा व नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारावेळी प्रमोद मतकर यांचा एक हात पूर्णपणे कोपरातून काढण्यात आलेला आहे.
दरम्यान, हल्ला झाल्याची माहिती कोरेगाव पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी माहिती घेतली. कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि संतोष पांढरे यांनी तपास केला. तपास करुन सातारा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर बचाव व सरकार पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद झाला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिश एन.एल.मोरे यांनी आरोपी दिपाली जाधव या महिलेला 4 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड तो न दिल्यास 2 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
प्रॉसिक्युशन स्कॉडच्यावतीने पोलिस हवालदा धनंजय दळवी यांनी सहकार्य केले. दरम्यान, गुरुवारी जिल्हा न्यायालयात महिलेला शिक्षा लागल्याची माहिती समोर आल्यानंर खळबळ उडाली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |