09:01pm | Aug 10, 2018 |
कराड : कराड विमानतळ विस्तारवाढीत बाधीत होणारे २८ खातेदार व त्यांच्या पुर्नवसनासंबंधीत असणाऱ्या बैठकीत बाधींताची भुमिका मांडण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या कृती समितीला प्रवेश नाकारण्यात आल्याने बाधीत सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. तर झालेल्या गोंधळात काही ठराविक खातेदारांशी प्रशासनाने चर्चा केली. दरम्यान, बैठकीनंतर प्रशासन व नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीबरोबर झालेल्या चर्चेत विमानतळ विस्तार वाढीला विरोध असल्याचे समितीने ठणकावून सांगितले.
दरम्यान, कराड विमानतळ विस्तारीकरणात बाधीत होणाऱ्या २८ सदस्यांचे शासन कशा पध्दतीने पुर्नवसन करणार आहे. त्यासाठी काय निकष लावण्यात आले आहेत. याबाबत प्रांताधिकारी खराडे यांनी बैठकीत तोंडी माहिती दिली. तसेच आठ दिवसात बाधीतांना आपले म्हणणे प्रशासनाला द्यावे, असे सांगितले. यावेळी तहसीलदार राजेंद्र शेळके, विमानतळ प्राधिकारणाचे कृणाल देसाई, मंडल अधिकारी महेश पाटील, वारूंजीचे सरपंच प्रमोद पाटील यांच्यासह कराड विमानतळ विस्तार वाढ विरोधी बाधीतांची कृती समितीचे सदस्य व बाधीत खातेदार उपस्थित होते.
कराड विमानतळ विस्तार वाढीत बाधीत होणाऱ्या २८ खातेदार प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांनी दि. ३ ऑगस्ट रोजी नोटीस देऊन पुर्नवसनासंबंधीत आपल्या मालकची घरे, गोठे, वर्कशॉप आदींच्या कागदपत्रे घेऊन चर्चा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बैठकीला हजर राहण्यास सुचित केले होते. त्यानुसार शुक्रवार दि. १० रोजी सकाळी १० वाजता बाधीत होणारे खातेदारांसह परिसरातील नागरिक तहसीलदार कार्यालयात हजर झाले.
सकाळी ११:३० वाजता बैठकीला प्रारंभ होण्यापूर्वी फक्त बाधींत खातेदारांनाच बैठकीसाठी प्रवेश देण्यात येईल, अशी ताठर भुमिका प्रशासनाने घेतली. यावेळी आम्ही बाधीतांच्यावतीने कृती समिती स्थापन केली आहे. त्यानुसार बाधीतांसह कृती समिती सदस्यांना प्रवेश देण्यात यावा, अशी विनंती समितीच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांना करण्यात आली. यावेळी बाधीतांच्यावतीने कोणी वकीलपत्र घ्यायचे काही कारण नाही, अशी भुमिका पं. स. सदस्य नामदेव पाटील यांनी घेतली. यावेळी उपस्थित अन्य बाधीत खातेदारांनी आम्ही कृती समिती स्थापन केली आहे. समितीच्यावतीने अध्यक्ष भूमिका मांडतील, असे स्पष्ट केले.
मात्र प्रशासनाने फक्त बाधीत खातेदारांना नोटीस बजाल्याचे सांगत अन्य लोकांना बाहेर जाण्याची सुचना केली. यावेळी वारूंजी गावचे सरपंच पैलवान प्रमोद पाटील यांनाही बाहेर जाण्याची विनती करण्यात आली. त्यामुळे अचानक उडालेल्या गोंधळात कृती समितीसह बाधीतांनी या बैठकीवर बहिष्कार टाकत बैठकीतून बाहेर पडले. मात्र या गोंधळात गडबडून गेलेले बाधीत बैठकीत अडकले. त्यामुळे प्रशासनाला मोजक्या सदस्यांशी चर्चा करत बैठक आटोपती घ्यावी लागली.
त्यानंतर कराड विमानतळ विस्तार वाढ विरोधी बाधीतांची कृती समिती व बाधीतांनी प्रांताधिकारी यांची भेट घेतली. यावेळी या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या नामदेव पाटील यांना हे कृती समितीचे सदस्य अथवा कोणी पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांना या बैठकीत बसता येणार, अशी भुमिका समितीने घेतल्याने प्रांताधिकारी यांनी पाटील यांना बाहेर जाण्याची विनंती केली.
या बैठकीत कृती समितीने सर्व बाधीतांसह परिसरातील नागरिकांचा विमानतळ विस्तारीकरणाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाने ही विस्तार वाढ रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तसेच कोणत्याही परिस्थिती ही विस्तार वाढ होऊ दिली जाणार नाही. त्यासाठी लोकशाही पध्दतीने आंदोलन हाती घेण्यात येईल. शिवाय वेळप्रसंगी याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. तसेच डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या लढ्याला नवीन कृती समितीचा पाठिंबाच आहे. या लढयाला ताकद देण्यासाठी नवीन कृती समितीची स्थापना केल्याचे एकमुखी सर्व बाधीत व उपस्थित नागरिकांनी सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, कराड विमानतळ विस्तार वाढीत बाधीत होणारे शेतकरी, परिसरातील रहिवाशी नागरिक यांच्यासह वारूंजी, मुंढे, केसे, पाडळी, सुपने गावातील बागायत जमीन क्षेत्रासाठी संजीवनी ठरलेली भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेसह बाधीतांनी एकत्रित येत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कराड विमानतळ विस्तार वाढ विरोधी कृती समिती स्थापन केली. या समितीने जमीन अधिग्रहण व पुर्नवसन आदी कायद्यांनुसार वारूंजी येथील कराड विमानतळाची विस्तार वाढ करता येणार नाही. याबाबत योग्य त्या कागदपत्रे व पुराव्यांंसह प्रशासनाबरोबर वारंवार चर्चा केली, लेखी दिले आहे. तसेच या प्रकल्पासाठी शामगाव येथील पर्यायी जागाही सुचवली आहे. असे असतानाही प्रशासनाने कोणतीही पूर्व सुचना न देता कच्ची मोजणी केल्याचे भासवत आमची दिशाभूल केली. ती कच्ची मोजणी पक्की व कायम मोजणी असल्याचे भासवत रेकॉर्ड रंगवले आहे. या आधारावर येथील बाधीत शेतकरी तसेच अन्य खातेदारांच्या साताबारा उताऱ्यावर मोजणी झाल्याचे दाखवून पुर्नवसनाचे शिक्के मारले आहेत. याकरिता कोणतीही शासकीय प्रक्रिया राबवलेली नाही. त्यामुळे विमानतळ विस्तारवाढीला आमचा विरोध कायम होता व असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मागणी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार
कराड विमानतळ विस्तारीकरणाला बाधीत खातेदारांसह परिसरातील नागरिकांचा विरोध असल्याचे विमानतळ प्राधिकारण राज्य शासनाला कळवले जाईल. शिवाय दोनही कृती समितीचे आज जिल्हा प्रशासनाला मिळालेली निवेदने संबंधित विभागांना पाठवली जातील.
- हिंम्मत खराडे , प्रांताधिकारी कराड
म्हणे.. डॉ. पाटणकरांनाही शक्य नाही
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |