04:29am | Oct 29, 2018 |
कराड : गाड्यावरील फ्लेक्स बोर्ड फाडल्याच्या संशयावरून एकावर दोघांनी चाकूने वार केल्याची घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास येथील कृष्णा घाटावर घडली. ओंकार सुरेश पवार (कुलकर्णी) (रा. शुक्रवार पेठ, कराड), हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. भरत विजय चव्हाण व विनायक सदानंद मोहिते, अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी ओंकार हा मित्रांसमवेत कृष्णा घाटावर फिरायला गेला होता. यावेळी त्याचे मामा रवींद्र हापसे हे देखील त्याठिकाणी गेले होते. त्यावेळी कृष्णा घाटावरील समर्थ स्टॉलजवळ भरत चव्हाण व विनायक मोहिते या दोघांनी ओंकार यास अडवले. भरत चव्हाण याने ओंकार यास पाठीमागून पकडले व विनायक मोहिते याने ङ्गतू माझ्या गाड्यावरील फ्लेक्स बोर्ड का फाडलास? असे विचारत ओमकार याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत त्याच्या उजव्या हातावर व छातीवर उजव्या बाजूला बरगडीत चाकूने भोसकले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला ओंकार जमिनीवर कोसळला. त्याला मित्रांनी तातडीने रिक्षातून कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यास कृष्णा रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार ओंकारला कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, रवींद्र राजाराम हापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भरत चव्हाण व विनायक मोहिते यांच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपिका जौंजाळ करीत आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |