02:30am | Aug 20, 2019 |
सातारा : फलटण तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रलंबित प्रश्न असणारा लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर आज रेल्वेची यशस्वी चाचणी घेतल्याने येत्या काही दिवसांत या मार्गावर रेल्वे धावणार आहे. लोकसभा निवडणुकीत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटणकरांना दिलेला शब्द पाळल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी लोणंद-फलटण या रेल्वेमार्गाची मागणी केली होती. तत्कालीन देवेगौडा सरकारने याला मंजुरी दिली होती. मात्र, त्यानंतर आलेल्या पुढार्यांनी स्वत:चे अपयश झाकण्यासाठी हा मार्ग जाणुनबुजून बंद ठेवला होता. परंतू माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी याबाबत पाठपुरावा करुन लोणंद-फलटण लोहमार्गाचे काम पुर्णत्वास नेले होते. सुमारे 23 वर्षानंतर त्यांचे पुत्र खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी त्यांच्या वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्याचे आश्वासन फलटणकर जनतेला दिलेले होते. गेल्या आठवड्यात यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेवून लोणंद-फलटण लोहमार्ग लवकरात लवकर सुरु करण्याची विनंती केली होती. यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल यांनीही लोणंद-फलटण लोहमार्ग 40 दिवसांत सुरु करु, अशी ग्वाही दिली होती. आज दुपारी लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर प्रत्यक्षात रेल्वे धावली. या क्षणाचे अनेक फलटणकर साक्षीदार झाले. अनेकांनी या रेल्वेच्या शेजारी उभे राहुन फोटो व सेल्फी काढल्या. या रेल्वेमार्गामुळे फलटण तालुक्यातील शेती, औद्योगिकीकरण, व्यापारीकरण तसेच दळणवळणाला चालना मिळणार आहे. आजची चाचणी झाल्यानंतर अजून दोन चाचण्या घेवून प्रत्यक्ष रेल्वे सुरु करणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
फलटण तालुक्याचा जिव्हाळ्याचा असणार्या लोणंद-फलटण रेल्वेमार्गाची आज यशस्वी चाचणी झाल्यामुळे तसेच खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी माढा लोकसभा निवडणुकीदरम्यान फलटणकरांना दिलेला शब्द पाळल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे अभिनंदन केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |