RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

मुदत संपूनही अडीच लाखाची ठेव मिळेना ; ‘दिव्य दत्त दिगंबर’च्या विरोधात दिक्षीत यांचा उपोषणाचा इशारा

25 July 2018 at 03:37

कोरेगाव : जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कोरेगाव येथील दिव्य दत्त दिगंबर पतसंस्थेमध्ये सुमारे 2 लाख 53 हजार रुपयांच्या ठेवींची रक्कम मुदत संपूनही मिळत नसल्याच्या कारणावरुन कोरेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक वसंतराव रंगनाथ दिक्षीत यांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग 1, सह सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, सहकार सचिव, सहकार आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, विभागीय सहकार निबंधक यांना दिला आहे. स्वातंत्र्यसैनिक वसंतराव दिक्षीत यांच्या बरोबर दत्त दिगंबर पतसंस्थेचे ठेवीदार विश्‍वास बर्गे, नुरअली पटवेकर, राजाराम कदम, छाया कदम, शहीदा पटवेकर, यशवंतराव घाडगे, राजेंद्र वीर यांच्यासह शेकडो ठेवीदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. यामुळे कोरेगाव तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेली दिव्य दत्त दिगंबर नागरी सहकारीस संस्था कोरेगाव, पुसेगाव, लोणंद, सातारा सह इतर तालुक्यांत कार्यरत आहे. माजी चेअरमन राजेंद्र गांधी, व्यवस्थापक विलास शिंदे आणि माजी संचालक मंडळ यांच्या गलथान कारभारामुळे सध्याची दिव्य दत्त दिगंबर आणि पूर्वाश्रमीची दत्त दिगंबर नागरी सहकारी संस्था आर्थिक अडचणीत आली. सातारा येथील संदीप मोझर यांनी निवडणुकीच्या माध्यमातून नाव बदलून दिव्य दत्त दिगंबर पतसंस्था या नावाने काही काळ चालविण्यास घेतली. मात्र दोन वर्षाच्या कालावधीनंतर काही माजी संचालकांच्या माध्यमातून श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सहकार विभागाकडे केलेल्या तक्रारीवरुन संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखालील दिव्य दत्त दिगंबर पतसंस्थेचे संचालक मंडळ राज्याच्या सहकार विभागाने बरखास्त केले आणि त्या जागी प्रशासक आणि प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याची परिस्थिती निर्माण झाली.

सध्या जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेमध्ये प्रशासक आणि प्रशासकीय मंडळ लवकरच कार्यरत होणार आहे. दत्त दिगंबर पतसंस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र गांधी, व्यवस्थापक विलास शिंदे आणि राजेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन माजी संचालकांच्या मनमानी आणि गैरकारभारामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे 11 हजार ठेवीदारांच्या सुमारे 16 कोटींच्या ठेवी मिळेनाशा झाल्या आहेत. शेकडो ठेवीदार गेली दोन वर्षे दिव्य दत्त दिगंबर पतसंस्थेच्या सातारा येथील मुख्यालयात, कोरेगाव येथील कार्यालयात त्यांच्या अडकलेल्या लाखो रुपयांच्या ठेवींसाठी हेलपाटे मारत आहेत. या पतसंस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र गांधी व्यवस्थापक विलास शिंदे यांसह त्यांच्या नेतृत्वाखालील सर्व माजी संचालक उच्च न्यायालयाच्या तात्पुरत्या (अंतरिम) जामीनावर कोरेगाव येथील स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने कोरेगाव शहरात मोकाट फिरत आहेत. मुंबई उच्च न्यायालयात दिव्य दत्त दिगंबर पतसंस्थेच्या चेअरमन, माजी चेअरमन, माजी संचालक, व्यवस्थापक यांच्या विरोधात ठेवीदारांच्यावतीने टाकलेल्या कोर्ट केसेस सुरु आहेत.

मात्र राजेंद्र गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील माजी संचालकांच्या मनमानी गैरकारभारामुळे जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी मिळेनाशा झाल्या आहेत. या 11 हजार ठेवीदारांच्यावतीने कोरेगाव येथील वयोवृद्ध ठेवीदार आणि स्वातंत्र्यसैनिक वसंतराव रंगनाथ दिक्षीत (वय 82) यांच्या 2 लाख 53 हजार रुपयांच्या ठेवी मिळाव्यात यासाठी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  कोरेगाव शहर परिसरातील इतर अनेक ठेवीदारांसमवेत आमरण उपोषणास बसणार आहेत. या आशयाचे निवेदन दिक्षीत यांनी नुकतेच सातारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, जिल्हा विशेष लेखा परिक्षक अजय देशमुख यांच्याकडे दिले आहे. निवेदनामध्ये त्यांनी त्यांच्या आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या, ठेवी परत मिळविण्यासाठी प्रशासकीय व स्थानिक पातळीवर दिला जाणारा त्रास यांचा उल्लेख केला आहे. आयुष्यभराची कमाई, उदरनिर्वाहाचे साधन, हक्काची ठेव परत मिळविण्यासाठी वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकाला संघर्ष करावा लागत आहे.

 

वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे आरटीओ कार्यालयासमोरच वाहतुकीचे तीन तेरा

वाहनचालकांना वाहतुकीचे नियम शिकवणार्‍या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालयासमोरच रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या बेकायदेशीर चारचाकी व दुचाकीच्या पार्किंगमुळे अजिंक्य हॉस्पिटल ते सैनिक स्कूल मार्गावर आरटीओ अधिकारी आणि एजंटांच्या संगनमताने

4 minutes before

जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला.

2 hours before

फलटण येथील दत्त नगर येथे महिलेचा खून

दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

13 hours before

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे

13 hours before