03:01pm | Jan 09, 2020 |
कराड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई आणि ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, ओंड यांच्या संयुक्त विद्यमाने येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षणात कराड तालुक्यातील महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवत मोबाईल फोनद्वारे विविध अॅप, अॅप्लिकेशन्स डाउनलोड करुन त्याचा वापर कसा करायचा याचे ज्ञान घेत डिजिटल साक्षरतेचे धडे गिरवले. या प्रशिक्षण कार्यशाळेद्वारे महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाची सफर घडवून आणली.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग व ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या संयुक्तविद्यमाने आयोजित महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षणाचे उद्घाटन एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी विशाल कोतागडे यांच्याहस्ते झाले. यावेळी कराड पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख, राज्य महिला आयोगाच्या प्रशिक्षिका भक्ती भाटवडेकर, कोरो संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयक वैशाली रायते, निर्भया पोलीस पथकाच्या मनिषा जाधव, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, सचिव नेताजी थोरात, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या क्षेत्रीय समन्वयक अनिता सुतार, सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा लोंढे, कराड नगरपालिकेतील दीनदयाल अंत्योदय योजनेच्या व्यवस्थापक गितांजली यादव, कराड नगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या समुपदेशन अधिकारी दिपाली रेपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्य महिला आयोगाच्या प्रशिक्षिका भक्ती भाटवडेकर यांनी उपस्थित महिलांना डिजिटल साक्षरता म्हणजे काय, डिजिटल साक्षरतेचे फायदे, डिजिटल अॅप- ई-जीईएम, डिजीलॉकर, आयआरसीटीसी, तेजस्विनी, आपले सरकार, उमंग, सातबारा, नमो याचा वापर, डिजिटल देयाकांचे फायदे आणि प्रकार, सुरक्षित डिजिटल देयके अदा करण्याबाबत सुचना, भीम अॅपबाबत पायाभूत माहिती, पैसे पाठविण्याच्या पध्दती, शिल्लक तपासणी, भीम अॅपद्वारे बील भरणे आदींसह सायबर सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले.
उपसभापती रमेश देशमुख म्हणाले, एक महिला शिकली की ती संपूर्ण घराला शिक्षित करते आणि ती आपल्या घराबरोबरच इतरही चार घरांतील महिलांना शिक्षित करते. डिजिटल साक्षरता ही काळाची गरज आहे. म्हणूनच महिलांना खर्या अर्थाने सक्षम आणि स्वावलंबी करायचे असेल तर डिजिटल साक्षर करणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्ञानदीप संस्थेने राज्य महिला आयोगाच्या मदतीने राबविलेला कार्यशाळेचा उपक्रम प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.
विशाल कोतागडे म्हणाले, राज्य महिला आयोगाकडून तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली महिलांमध्ये डिजिटल सेवा आणि तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता विकसित करण्यासाठी प्रॅक्टिकल लर्निंग्जवर भर देत होत असलेली ही कार्यशाळा दिशादर्शक आहे.
अनिता सुतार यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. वैशाली रायते यांनीही मार्गदर्शन केले. सौ.मधुराणी थोरात यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यपध्दती व विविध उपक्रमांची माहिती दिली. या प्रशिक्षणात सुमारे 250 अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. अर्चना पाटील व मृणाल गरुड यांनी सुत्रसंचालन केले. सुवर्णा सुर्वे, सुनीता डाईंगडे, समृध्दी चव्हाण, वर्षा देशमुख यांनी स्वागत केले. श्वेता मोरे यांनी आभार मानले.
प्रशिक्षणानंतर अभिप्राय व्यक्त करताना प्रशिक्षणार्थींनी आपल्या मनोगतात महिलांना डिजिटल उपकरणांचा (स्मार्ट फोन्स) वापर, इंटरनेटचा कार्यक्षम वापर, दैनंदिन गरजेची महत्वपूर्ण विविध अॅप्स, अॅप्लिकेशन्स डाउनलोड कशी करायची व सायबर सुरक्षाबाबत ज्ञानदीप संस्थेच्या पुढाकारातून मिळालेले प्रशिक्षण महत्वपुर्ण ठरणारे असल्याचे सांगितले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |