कराड : टेंभू (ता.कराड) येथे कै.गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुतळ्याची शुक्रवारी दि. 18 रोजी मध्रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली होती. या समाजकंटकांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास विलंब का झाला या प्रकरणाचीही सखोल चौकशी व्हावी याबाबत टेंभू ग्रामस्थांच्यावतीने सोमवारी तहसिलदार व कराड तालुका पोलीस उपअधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, टेंभू ता. कराड येथे आगरकर प्रतिष्ठानकडून सुमारे सात-आठ वर्षापूर्वी कै. गोपाळ गणेश आगरकर हायस्कूलच्या प्रांगणात आद्यसमाजसुधारक आगरकर यांचा पुतळा उभारला होता. शुक्रवारी दि. 18 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी आगरकर यांच्या पुतळ्याची विटबंना केली. या घटनेचे तीव्र पदसाड जिल्हाभर उमटले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यातील आगरकरप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेला चार दिवस होऊन गेले तरी अज्ञात समाजकंटक सापडला नसून पोलिसांनी त्याचा शोध लवकरात लवकर घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी. घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास विलंब का झाला या घटनेची सुद्धा सखोल चौकशी व्हावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा टेंभू ग्रामस्थांनी दिला आहे.
निवेदनावर बब्रुवान पाटील, प्रताप सावंत, तात्यासो लेंगरे, अमोल बाबर, तुषार पाटील, पंकज पाटील, सूरज मुल्ला, विक्रम कदम, दिगबंर बाबर, विकास भंडारे, संग्राम पाटील, समाधान नलवडे, वैभव नलवडे, सौरभ जाधव, निशिकांत बनसोडे, संभाजी पवार, वैभव हुलवान यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |