सातारा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले माझे वडील असून 34-35 वर्षांपूर्वी ते घर सोडून गेले होते. ते माझे वडील आहेत, अशा प्रकारची पोस्ट उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथील राजकुमार या युवकाने फेसबुकवर टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच या संदर्भातील त्या युवकाच्या कॉल रेकॉर्डिंगची क्लिपही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, रामदास आठवले यांचे जनसंपर्क अधिकारी हेमंत रणपिसे यांनी मात्र हा प्रकार फेटाळून लावला असून संबंधितावर फौजदारी कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना दिली.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांच्यावरही रोहित शेखर नावाच्या युवकाने ‘ते माझे वडील आहेत’ असा दावा करत तिवारी यांना न्यायालयात खेचले होते. अनेक दिवसांच्या न्यायालयीन लढाईनंतर न्यायालयाने एन. डी. तिवारी व रोहित शेखरच्या डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले होते. डीएनए चाचणीनंतर एन. डी. तिवारी हेच रोहित शेखरचे वडील असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर एन. डी. तिवारी यांनी रोहित शेखरला आपला मुलगा म्हणून स्विकारले होते. तीन दिवसांपूर्वीच रोहित शेखर याचा दिल्लीत संशयास्पद मृत्यू झालेला आहे. सध्या दिल्ली पोलिसांनी अज्ञातावर रोहित शेखरच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. असे असतानाच केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री तथा रिपाइंचे नेते रामदास आठवले यांच्यावर उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथील राजकुमार नावाच्या युवकाने ‘ते माझे वडील आहेत, तसेच ते 34-35 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश येथे आले होते. काही दिवस त्यांचे माझ्या घरी वास्तव्य होते.’ असे म्हणत रामदास आठवलेच माझे वडील आहेत, याचे सर्व पुरावे व साक्षीदार माझ्याकडे आहेत, असा दावा त्या युवकाने फेसबुकवर केलेला आहे.
ही गोष्ट सोलापूर येथील धीरज पुणेकर या सामाजिक कार्यकर्त्याच्या निदर्शनास आल्यानंतर धीरज यांनी संबंधित राजकुमार यांना फोन लावून याबाबत जाब विचारला. परंतू त्या युवकानेच धक्कादायक विधाने करीत रामदास आठवले हेच माझे वडील आहेत, हे ठामपणे सांगितले. संबंधित संभाषणाची व्हॉईस क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. संबंधित युवकाने महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेवून रामदास आठवले हेच माझे वडील आहेत, त्या संबंधातील सर्व पुरावे जाहीर करण्याचा मानसही व्यक्त केलेला आहे. दरम्यान, रामदास आठवले यांच्यासारख्या चळवळीतील नेत्यावर अशाप्रकारचा आरोप केल्यामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबरोबर संपर्क होवू शकला नसला तरी आठवले यांचे जनसंपर्क अधिकारी हेमंत रणपिसे यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. संबंधित युवक हा विकृत असून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे त्यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना सांगितले असून संबंधित युवकावर फौजदारी कारवाई करणार असल्याची माहितीही त्यांनी ‘सातारा टुडे’ला दिली आहे. दरम्यान, रामदास आठवले यांच्यासारख्या चारित्र्यसंपन्न नेत्यावर अशाप्रकारचे शिंतोडे उडवल्यामुळे याबाबतच्या तीव्र प्रतिक्रिया राजकीय व सामाजिक क्षेत्रात उमटणार आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |