सातारा : सदरबझारमधील नातेवाईकांकडे जात असताना रविवारी रात्री आठच्या सुमारास कारचा आरसा धडकल्याने झालेल्या वादावादीनंतर लक्ष्मीटेकडीत राहणार्या आठ जणांनी कोल्हापुर येथील युवकांना मारहाण केली. हाणामारी सुरु असताना घटनास्थळी पोलिस गेल्यानंतर जमावाने पोलिसांना शिविगाळ व धक्काबुक्की केली असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळासह दोन विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सागर बाबुराव मोहिते हे कोल्हापूर येथे राहण्यास असून ते मित्रांसमवेत अल्टो कारमधून रायगड येथे गेले होते. रायगडहून परतत असताना त्यांनी कारमध्ये असणार्या धीरज शिंदे यांच्या सदरबझार मधील आजोळी जाण्याचे ठरवले. त्यानुसार सदरबझार मधील चौकात कार घेवून आले असतानाच कारच्या आरशाचा धक्का शंकर मारुती बल्लाळ (रा. सदरबझार) यांना बसला व त्यावरुन वाद झाला.
वादावादी सुरु असतानाच बल्लाळ याने इतर साथीदारांना बोलावत परिसरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बल्लाळ याने इतरांच्या मदतीने कारमध्ये असणार्या युवकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या झालेल्या झटापटीत एकाने कार चालवणार्या मोहिते यांच्या डाव्या पायावर फरशी मारली. फरशी लागल्याने मोहिते हे जखमी झाले.
सातारा शहर पोलिसांना सदरबझार येथील गोंधळाची माहिती मिळाल्यानंतर सदरबझार चौकीचे सहाय्यक फौजदार श्रीधर पवार, देसाई हे त्याठिकाणी गेले. पोलिसांनी जमावाला पांगवत जखमी मोहिते यांना चौकीत नेण्याचे ठरवले. पोलिस जखमी मोहिते यांना ताब्यात घेत असतानाच बल्लाळ व इतरांनी पोलीस हवालदार देसाई यांना शिविगाळ, धक्काबुक्की केली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, जखमी झालेल्या सागर मोहिते यांनी शंकर बल्लाळ, रोहित देवकुळे, अभिजीत पवार, बालाजी वाघमारे, राजू (पुर्ण नाव नाही) यांच्यासह आठजणांविरुध्द तक्रार दिली आहे. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहाय्यक फौजदार पवार यांनी याच आठजणांवर दुसरी तक्रार दिली असून त्यानुसार दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |