10:48pm | Sep 16, 2018 |
सातारा : सातार्यातील शासकीय विश्रामगृहावर आज सातारकरांना खर्या अर्थाने सुखद धक्का बसला. याचे कारणही तसेच आहे. उत्तर प्रदेशातील बाहुबली तथा राजद नेते रघुराज प्रतापसिंह उर्फ राजाभैया यांनी आज दुपारी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्री. छ. उदयनराजे यांची सदिच्छा भेट घेतली.
उत्तर प्रदेशच्या राजकारणातील वादग्रस्त नेते म्हणून रघुराज प्रतापसिंह उर्फ राजाभैया यांची ओळख आहे. उत्तर प्रदेशातील हेवीवेट नेत्यांमध्ये राजाभैया यांची गणना केली जाते. मुलायम सिंह यादव व अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये राजाभैया मंत्री होते. सुमारे सहा वेळा कुंडा या त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. तसेच गेल्या निवडणुकीत ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. आज दुपारी राजाभैय्या अकलूज येथील शिवसेना नेते धवलसिंह मोहिते-पाटील तसेच राजाभैयांसह त्यांच्या सहकार्यांनी सातार्यातील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी या दोन्ही बाहुबली नेत्यांमध्ये काही तास चर्चा झाली. याप्रसंगी खा. उदयनराजे यांनी राजाभैया यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत. माझ्या घरातील देव्हार्यात देवांशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर आहे. प्रथमपासूनच छत्रपती घरण्यावर माझे विशेष प्रेम आहे. उद्या मी रायगड येथे जाणार आहे. छत्रपतींच्या समाधीवर नतमस्तक होणार आहे. तलवारीच्या जोरावर मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले, शिवछत्रपतींचे वंशज म्हणून खासदार उदयनराजे यांच्या बद्दल आम्हाला नितांत आदर आहे. येणार्या काळामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांना उत्तर प्रदेशात येण्याचे आमंत्रण देणार आहे. त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही. मित्र असावा तर खा. उदयनराजे यांच्यासारखा मनाने मोकळा आणि कार्याने मोठा, असे गौरवोद्गार प्रतापसिंह उर्फ राजाभैय्या यांनी काढले.
दरम्यान, खा. उदयनराजे आणि राजाभैया यांच्या विश्रामगृहावरील भेटीमुळे सातार्यातील राजकीय क्षेत्रात येणार्या काही काळामध्ये नक्कीच खळबळ उडणार, याचे संकेत या बैठकीच्या निमित्ताने मिळू लागले आहेत. यावेळी अभिनेते मुकेश तिवारी, अकलूजचे धवलसिंह मोहिते-पाटील, युवानेते संग्राम बर्गे, जितेंद्र खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |