सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारानजीक हॉटेल मानससमोर दुभाजकावर भरधाव वेगातील कार आदळल्यानंतर ती कार पलटी होवून हॉटेलसमोरील पानपट्टीमध्ये घुसून झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार झाला असून दोघेजन गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, हा अपघात मंगळवारी पहाटे झालेला आहे.
भूपाल गायकवाड हे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व उपचार सुरु असताना मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याशिवाय त्याचा सहकारी मिथुन चक्रवर्ती शंकर राहू (सध्या दोघे रा.हॉटेल मानस व मूळ रा.कर्नाटक) व कारचालक रंगराव दत्तात्रय वाठारकर (रा.म्हडा कॉलनी, कोल्हापूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, रंगराव वाठारकर हे स्विफ्ट कारमधून पुणेच्या दिशेने निघाले होते. कार मंगळवारी पहाटे हॉटेल मानससमोर आल्यानंतर रस्त्यावरील दुभाजकावर आदळली व ती कार घसरत हॉटेलसमोर असणार्या पानटपरीमध्ये घुसली. या पानटपरीमध्ये पानटपरी चालक भूपाल गायकवाड व मिथून चक्रवर्ती नेहमीप्रमाणे झोपलेले होते. दररोज हॉटेल बंद झाल्यानंतर ते दोघे नेहमीप्रमाणे पानटपरी बंद करुन आतून शटर ओढून झोपी जातात. सोमवारीही पानटपरीमध्ये ते झोपलेले होते.
दरम्यान, अपघातानंतर मोठ्याने आवाज झाल्याने हॉटेलमधील वॉचमन यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर तिघे जखमी झाल्याने मदतीसाठी याचना करत होते. पानटपरीमध्ये कार घुसल्याने त्यातील दोघांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. अखेर जखमींना बाहेर काढल्यानंतर तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तिघांना दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना यातील भूपाल गायकवाड यांचा मृत्यू झाला. तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |