04:02pm | Nov 22, 2018 |
कराड : येथील कार्वे नाका परिसरातील बापूजी साळुंखे नगरातील कॉलनीत चोरट्यांनी रविवारी रात्री धुमाकूळ घालत चार ठिकाणी चोरी केली. या घटनेत 30 हजाराची रोकड, दुचाकी, मोबाईल लंपास करण्यात आला असून या चोर्यांमुळे कार्वेनाका परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या चोरीच्या घटनांची शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्रीपर्यंत नोंद नव्हती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कार्वे नाका परिसरातील बापूजी साळुंखे नगरमधील कॉलनीत चोरट्यांनी रविवारी रात्री चार घरांत चोरी केली. वैभव सदाशिव दाभोळकर यांच्या मालकीची हिरो पॅशन आणि विक्रम हरिदास संकपाळ यांची होंडा दुचाकी चोरून नेली. जलील शेख यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मात्र, आतील दुसरा दरवाजा न तुटल्याने तेथे चोरीचा प्रयत्न फसला. बापुराव श्रीपती पाटील यांच्या घरातील 30 हजारांची रोकड व मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. एकाच कॉलनीत आणि एकाच रात्रीत चोरट्यांनी चार ठिकाणी चोरी केल्याने खळबळ उडाली. चोरट्यांनी काही घरातील कपाटे फोडून कपाटातील साहित्य विस्कटून टाकले. दरम्यान, या घटनेबाबत कोणीही पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली नाही.
दरम्यान, कार्वे नाका परिसरातच पोलीस लाईन आणि पोलीस उपअधीक्षकांचा बंगला आहे. असे असताना त्याच परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने पोलिसांची नाचक्की झाली आहे. पोलिसांनी या परिसरात रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |