03:46pm | Mar 08, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला पदाधिकारी यांनी नियोजन केले असताना याच दिवशी सकाळी सातारा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर भाजप-सेना राज्य सरकार सत्तेवर असल्याने एक दिवस मूक निदर्शने करण्याचे आवाहन केले होते पण, त्याला काही महिला पदाधिकारी व कार्यकर्ती यांनी नकार दिला आहे.त्यामुळे महिला दिनी राष्ट्रवादीचे निदर्शने केली जाणार का? याकडे लक्ष वेधले गेले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य आहे. त्यामुळे या पक्षाच्या आंदोलनाची नोंद घ्यावी लागते. सध्या विधिमंडळ सदस्यांचे विधानभवन, मुबंई येथे उन्हाळी हंगामातील अधिवेशन सुरू आहे. अशा वेळी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्ती नी प्रत्येक ठिकाणी जाऊन महिलांच्या प्रश्नाबाबत एक दिवस मूक निदर्शने केली पाहिजे असे राष्ट्रवादी नेत्यांनी ठरवले आहे. तशा सूचना देण्यात आल्या होत्या. पण, महिला दिनाचा सर्वत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महिलांनी शब्द दिला आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून पक्षाचे नेते याचा आदेश मानण्यात येतो. त्याची कदर म्हणून अशा महिलांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे ही अपेक्षा असते. पण, अनेकदा सामान्य महिलांना डावलून प्रस्थापितांना व आर्थिक स्थिती चांगली असण्याऱ्या महिलांना संधी उपलब्ध करुन दिली आहे. या महिला नेत्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. पक्षाच्या साध्या मेळाव्याला येत नाहीत. महत्वाच्या पदावर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांना संधी मिळाली त्यांनीच पक्षाशी बंडखोरी करून पक्षाला अडचणीत आणले आहे. असा ही आरोप केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही महिलांनी मूक निदर्शने करण्यास पक्ष नेत्यांना स्पष्टपणे नकार दिल्याचे खात्रीशीर वृत्त समजले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत मोठी गटबाजी आहे. त्यातून राज्य व केंद्रात सत्ता नसल्याने काही महिला कार्यकर्ती पक्षाच्या दृढीकरण भूमिकेवाबत साशंकता व्यक्त करीत आहेत. त्यामुळे एकेकाळी सातारा जिल्हात अधिराज्य गाजविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे बोलले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये पक्षभेद विसरून महिलांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय असेल असा विश्वास महिला वर्ग व्यक्त करीत आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीचा इन्कार केला आहे. सातारा जिल्हात राष्ट्रवादीचेच प्राबल्य असल्याचा ही दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला जिल्ह्याध्यक्ष सौ समिन्द्रा जाधव, कार्यध्यक्ष सौ जयश्री पाटील व मान्यवर महिलांनी केला आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |