RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

डॉ भरत वाटवाणी यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार

11 September 2019 at 03:01

पुणे मेंटल हेल्थ फोरम मार्फत ४ ऑक्टोबर रोजी पुरस्काराचे पुण्यात वितरण

पुणे : मनोदय मेंटल हेल्थ फोरम, कर्वे समाज सेवा संस्था पुणे च्या वतीने मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा यावर्षीचा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार २०१९ हा प्रथितयश मनोविकार  तज्ञ व रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम करीत असलेले तसेच गतवर्षीच्या रँमन मँगसेसे पुरस्काराचे मानकरी डॉ भरत वाटवाणी यांना जाहीर झाला असून दि. ०४ ऑक्टोबर रोजी त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मनोदय मेंटल हेल्थ फोरम, पुणे चे कार्याध्यक्ष प्रा. चेतन दिवाण यांनी दिली.

मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मानसोपचार तज्ञ, मनोसामाजिक कार्यकर्ते, सायकॉलॉजीस्ट व इतर सर्व मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांच्या विचारांची देवाण- घेवाण व्हावी तसेच मानसिक आरोग्यासंबंधी समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी एकत्र येऊन २०१६ मध्ये पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या पुढाकाराने मनोदय मेंटल हेल्थ फोरम ची स्थापना करण्यात आली असून मानसिक स्वास्थ्यावर आधारित जनजागृतीपर विविध उपक्रम राबविने तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रामधील कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हा या फोरम चा मुख्य उद्देश असून फोरम च्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये अनन्य साधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा दरवर्षी जीवन गौरव पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात येतो.

जीवन गौरव पुरस्कार्थींची निवड करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे सदस्य प्रा. चेतन दिवाण, डॉ मोहन आगाशे, डॉ सुप्रकाश चौधरी, डॉ वासुदेव परळीकर, डॉ महेश ठाकूर व डॉ जयदीप पाटील यांनी एकमताने यावर्षीचा मनाचा जीवन गौरव पुरस्कार हा रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या व आजपर्यंत आठ हजाराहून जास्त मनोरुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या डॉ भरत वाटवाणी यांना देण्याचा निर्णय घेतला. डॉ भरत वाटवाणी यांना त्यांच्या याच अतुलनीय कामगिरीबद्दल गतवर्षी मनाच्या रँमन मँगसेसे पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.

सर्वप्रथम २०१६ मध्ये पुणे येथील जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ उल्हास लुकतुके तसेच २०१७ मध्ये जेष्ठ मानसोपचार तज्ञ व प्रसिद्ध सिने अभिनेते डॉ मोहन आगाशे तसेच गतवर्षी २०१८ मध्ये इंडीयन सायकीयाट्रीक सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ विद्याधर  वाटवे व मानसिक आरोग्यावर आधारित सिनेमा निर्मिती करणाऱ्या सुमित्रा भावे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

यावर्षी कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाच्या दि ०४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटन समारोह प्रसंगी डॉ भरत वाटवाणी यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.

डॉ भरत वाटवाणी यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी मानसिक आरोग्य क्षेत्रामधील व्यक्तींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनोदय मेंटल हेल्थ फोरम, पुणे च्या वतीने फोरम चे कार्याध्यक्ष प्रा. चेतन दिवाण मुख्य सल्लागार डॉ मोहन आगाशे व संस्थेचे प्र संचालक डॉ. महेश ठाकूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

उदयनराजेंची पगडी नरेंद्र मोदींच्या डोक्यावर

राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजप प्रवेश केलेला आहे. परवा दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देवून भाजपात प्रवेश केला.

21 hours before