सातारा : तुझ्यामुळेच नोकरीचा राजीनामा द्यावा लागला, असे म्हणत शाहूपुरी येथे राहणार्या विनय अविनाश माने (वय 24) या युवकाने शनिवारी रात्री सातच्या सुमारास किरण सर्जेराव माने (वय 26, रा. भक्तवडी, ता.कोरेगाव) याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून बॉंबे रेस्टॉरंट परिसरात कोयत्याने हल्ला केला. जखमी माने याच्यावर उपचार सुरु असून पोलिसांनी हल्लेखोरास अटक केली आहे. दरम्यान, थरारक घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी संशयितालाा पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
विनय माने हा काही दिवसांपुर्वी एमआयडीतील एका कंपनीमध्ये नोकरीस लागला होता. किरण माने हा पण तेथेच नोकरीला होता. दोन दिवसांपूवी कंपनी व्यवस्थापनाने विनय माने याला बोलावत नोकरीचा राजीनामा लिहून घेतला होता. किरण माने यानेच काहीतरी सांगितले असेल, त्यामुळेच राजीनामा कंपनीने लिहून घेतल्याचा समज विनय माने याचा झाला होता. शनिवारी किरण माने हा बॉंबे रेस्टॉरंट येथून वाढेफाट्याकडे निघाला होता. त्याठिकाणी विनय माने हा आला व त्याने सोबत आणलेली मिरचीची पूड हातात घेत किरणच्या डोळ्यात टाकली. यावेळी होणारी मारहाण अडवत असतानाच विनय माने याने किरणच्या पाठीत कोयत्याने वार केला. रस्त्यावर हा थरारक प्रसंग घडत असताना परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दोन युवकांच्या भांडणामुळे तणावाचे वातावरणही झाले. परिसरातील नागरिकांनी संशयित युवकाला ताब्यात ठेवले असतानाच पोलीस घटनास्थळी पोहचले. संशयिताला ताब्यात घेवून परिसरातील गर्दी हटवली. किरण याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |