02:44am | Nov 06, 2018 |
कराड : अल्पवयीन मुलीचा गळा चिरून, तिच्या दोन्ही हाताच्या मनगटावर धारदार शस्त्राने वार करणार्या संशयीत युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अजय सुनील गवळी, असे त्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्याच्यावर सातारच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी संशयित युवकासह तिघांवर शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, जखमी अल्पवयीन मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ही घटना दोन कुटुंबातील वाद की अन्य कोणत्या कारणाने घटना घडली आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. या हल्ल्याप्रकरणी संशयित अजय सुनील गवळी, त्याची आई सुनीता सुनील गवळी व बहीण सौ. नीलम बाबर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला आहे. संशयित अजय गवळी याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असताना अजय सुनील गवळी याने तिला ठार मारण्याच्या उद्देशाने घरात घुसून तिचे तोंड हाताने दाबून तिच्या गळ्यावर व हातावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. यासाठी अजयला आई व बहिणीने सहकार्य केल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग कापसे तपास करत आहेत.
दरम्यान, सोमवारी सकाळी वारुंजी फाटा परिसरात अजय गवळी याने विषारी औषध घेतल्याचे समजताच नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर त्याला सातारच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |