04:20pm | Apr 17, 2019 |
सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची सातारा नगरीत आज दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रेल्वे इंजिन सातार्यातील गांधी मैदानावर धडाडणार आहे. या सभेला लोकसभा निवडणुकीतील ‘फ्री हिटवर’ राजसाहेब कोणाच्या गोलंदाजीवर चौकार, षटकार मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी माणसांची अस्मिता जपणारे मनसे सैनिक यांनी या सभेसाठी जोरदार तयारी केली असून छत्रपती शिवरायांचे वंशज श्री. छ. उदयनराजे व राजसाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे किस्सेही ऐकण्यास मिळणार आहेत. त्याचबरोबर राजकारणातील जोडगोळी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर ठाकरी भाषेत होणारे भाष्य ऐकण्यासाठी सातारकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. युतीने याठिकाणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याबाबत ठाकरे कोणती नवीन उपमा देणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा शहरात मनसेच्या निर्मितीपूर्वी राज ठाकरे यांनी मान्यवरांची भेट घेवून त्यांचे मनोगत जाणून घेतले होते. त्यानंतर त्यांनी मनसेची स्थापना केली होती. सध्या लोकसभेला मनसेनी उमदेवार दिलेला नाही. त्यामुळे फ्रि हिट मिळाला असून षटकार, चौकारांच्या आतषबाजीने श्री. छ. भोसले यांच्या मताधिक्यात अधिक भर पडेल, असा विश्वास मनसेचे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी धैर्यशील पाटील, राजू केंजळे, युवराज पवार यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
या जाहिर सभेला गांधी मैदानावर किमान 20 हजार काँग्रेस आघाडीचे समर्थक उपस्थित रहाणार असल्याची शक्यता गृहीत धरून मोठा पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सभेचे थेट शहरातील प्रमुख चौकात प्रोजेक्टर लावून प्रक्षेपण केले जाणार आहे. सातार्यातील जाणकार मंडळी ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर राज सभेला संबोधीत करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |