सातारा : महाराष्ट्रात न्यायालयीन कामकाजाची भाषा मराठी असताना न्यायालयातील नोकरभरतीच्या ऑनलाईन अर्जात ‘उमेदवाराला गुजराथी भाषा लिहिता / वाचता येते का?’ असा अनाठायी प्रश्न विचारून राज्य सरकारने भलतीच आगळिक केली आहे. म्हणजे आता राज्यातील न्यायालयात नोकरी मिळवायची झाल्यास गुजराथी येणे अनिवार्य झाले. महाष्ट्रातील न्यायालयामध्ये हा गुजराती प्राणायाम कशासाठी ? असा सवाल तमाम मराठीजनांना पडला असून याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मध्यंतरी राज्यातील न्यायालयांमधील स्टेनोग्राफर, ज्युनियर क्लार्क, शिपाई पदांसाठी नोकरभरती निघाली. एकावेळी हजारो पदांची मेगा भरती निघाल्याने बेरोजगार तरूण - तरूणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. या भरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रमानुसार अनेक जिल्ह्यातून अर्ज केले आहेत. मात्र नोकरीसाठीचा ऑनलाईन अर्ज पाहिल्यानंतर हा आनंद क्षणभंगूर ठरला. कारण या अर्जात चक्क ‘उमेदवाराला गुजराथी भाषा लिहिता / वाचता येते का?’ असा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न होता. बरे, या प्रश्नाचे उत्तर ‘लागू नाही’ असे लिहिण्यास वाव नव्हता. तसे केल्याने उत्तर सबमिट होत नव्हते. उत्तर होय किंवा नाही असेच अपेक्षित असल्यामुळे होय लिहावे तर भाषा येत नाही व नाही लिहावे तर नोकरीची संधी जाण्याची भीती आणि लिहूच नये तर अर्ज बाद होण्याची भीती यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. गुजराथी येत नसल्याने भरतीच्या पुढील प्रक्रियेतून वगळले जाण्याच्या शक्यतेने उमेदवार धास्तावले आहेत.
वास्तविक गुजराथी ही आपली मातृभाषा नाही. राज्यभाषा नाही. किंबहुना ती पाठ्यपुस्तकातूनही शिकवली जात नाही. एका बाजुला मराठीसाठी मराठीजन प्राणपणाने लढत आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून संघर्ष केला जात आहे. आणि दुसरीकडे ही अशी मराठीची गळचेपी करण्याची कृत्ये सरकारच्या माध्यमातूनच होत आहेत हे अतिशय गंभीर आहे. त्याबद्दल विविध स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हे अति झाले : अॅड. विकास पाटील शिरगावकर
हे अति झाले... पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मर्जीनेच हे होत असून राज्य सरकार कोट्यवधी मराठी जनतेपेक्षा त्यांची मर्जी सांभाळण्यात धन्यता मानत आहे, अशी परखड प्रतिक्रिया येथील माजी विशेष जिल्हा सरकारी वकील, लिम्का बुक पुरस्कार विजेते अॅड. विकास पाटील - शिरगावकर यांनी व्यक्त केली आहे. गुजराथी महाराष्ट्रात शिकवली जात नसताना सरकारचा हा अट्टहास का सुरू आहे? ज्यांचे नाव पुढील प्रक्रियेसाठी यादीत आले, त्यांना गुजराथी लिहिता / वाचता येते का ? या प्रश्नांची उकल झाली पाहिजे. उच्च न्यायालयाने ही बातमीच रिट पिटिशन म्हणून दाखल करून घ्यावी.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |