RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

खचलेले काँग्रेस कार्यकर्ते माझ्या संपर्कात : राधाकृष्ण विखे

04 June 2019 at 17:10

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने पक्षाचे कार्यकर्ते खचून गेले आहेत. पुढील राजकीय रणनिती काय असावी हा त्यांच्यापुढील प्रश्न आहे. असे अनेक नेते आणि कार्यकर्ते आपल्या संपर्कात आहेत, असा दावा ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. 

आपण विरोधी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तांत्रिकदृष्ट्या तो विधानसभा अध्यक्षांनी अद्याप मंजूर केलेला नाही. या पदावर राहण्यात आपल्याला आता स्वारस्य राहिलेले नाही. त्यामुळे ते पद सोडून दिलेले आहे. त्या पदावर आता कोणाची वर्णी लावायची, हा काँग्रेसचा प्रश्न आहे, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते भेटत असले तरी प्रत्येकवेळी राजकीय चर्चा असतेच असे नाही. जुने संबंध आहेत; त्यामुळे अनेक जण भेटतात आणि चर्चा करतात, असेही विखे म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालनंतर नगर जिल्ह्यात विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. गेल्या आठवड्यात संगमनेरमध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स फाडण्यात आले होते. त्यावर ‘त्यांनी आता पराभव पचविण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. यापुढे असे अनेक फ्लेक्स लागणार आहे. विजय स्वीकारता येतो, तसा पराभवही पाचविता आला पाहिजे,’ असा टोला विखेंनी थोरात यांचे नाव न घेता लगावला. 

विधानपरिषदेचे सभापती नेमके कोणाचे ?

राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापती खरे तर सर्व पक्षांचे हवे पण ते एका पक्षाचे असल्यासारखे वागत आहेत,'' त्यामुळे विधानपरिषदेचेसभापती नेमके कोणाचे? हा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.

yesterday

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटप जाहीर; पाहा, कोणाला मिळालं कुठलं खातं?

राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी सकाळी (दि.१६) विस्तार झाल्यानंतर नव्याने १३ मंत्र्यांना मंत्रिमंडळात समावून घेण्यात आले. तर विद्यमान ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले.

17 June 2019 at 14:44