02:49am | Dec 01, 2019 |
कराड : रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ कराड व कराड बॅडमिंटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कै. राजाभाऊ कोटणीस स्मृती आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले व सौरभ पाटील, नगरसेवक कराड नगरपरिषद कराड यांच्या हस्ते आज शिवाजी स्टेडियम येथील बॅडमिंटन कोर्टवर समारंभ पार पडला.
या प्रसंगी रोटरी अध्यक्ष जगदिश वाघ यांनी प्रास्ताविक केले. कै.राजाभाऊ कोटणीस यांच्या स्मरणार्थ 20 वर्षापासून चालू असलेल्या या स्पर्धा आता रोटरी क्लब संदीप कोटणीस यांच्या सहकार्यातून गेली 10 वर्षे भरवत आहे. महाराष्ट्रतील 9 जिल्हयामधून 450 स्पर्धक सहभागी झाले आहेत.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी राजभाऊ कोटणीस यांचे बॅडमिंटन प्रेम व या खेळा प्रति असलेल्या अनेक आठवणी सांगितल्या. सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिऐशन नेहमीच पाठीशी असेल याची ग्वाही दिली.
सौरभ पाटील यांनी कराड नगरीचा खेळाबद्दल असलेला वारसा रोटरी जातं करत आहे त्या आभार व्यक्त केले. नगरपालिकेच्या वतीने बॅडमिंटन खेळासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. पुढील काळात राज्यस्तरीय स्पर्धा भरवाव्यात असा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमात रोटरीकडून कराडमधील नामवंत राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू श्री. मनोहर रुईकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना रुईकर यांनी नगरपालिका सेवेत असताना बांधलेल्या शिवाजी स्टेडियम बॅडमिंटन हॉलमध्ये आज सत्कार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमास रोटरी ट्रस्ट अध्यक्ष शशांक पालकर, कराड बॅडमिंटन क्लब अध्यक्ष किशोर कुलकर्णी, संदीप कोटणीस,प्रोजेक्ट चेअरमन राहुल कुलकर्णी,प्रबोध पुरोहित,निलेश फळसणकर,श्री पाटील साहेब, चंद्रकुमार डांगे, गजानन माने,ओंकार पालकर, अतुल पाटील, सेतूमाधव जोशी,मनोज कान्होरे,प्रकाश गद्रे,नगर पालिका पदाधिकारी, सहभागी खेळाडू व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार गद्रे यांनी केले व आभार प्रदर्शन रोटरी सचिव राजीव खलीपे यांनी केले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |