12:41am | Oct 03, 2018 |
फलटण : न्यू फलटण शुगर्स वर्क्स च्या गतवेळी गाळपास गेलेल्या उसाच्या बिलाचा प्रश्न गंभीर झाला असताना हे राज्यकर्ते शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करीत आहे व आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी केला असून ज्यांनी देशाला जगाच्या पातळीवर भारत देशाला सन्मान मिळवून देत अहिंसेचे प्रतीक असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी लोकांना सर्वात मोठा उपोषनाचा अधिकार दिला या प्रमाणे आम्ही गेली 15 दिवस झालं उपोषणास बसलो असताना आमच्या शेतकऱ्यांकडे बघण्याचा प्रयत्न होत नसल्याने या तालुक्यात लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न माझ्या मनात येत असून एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर आमचे पैसे मिळणार का? असा त्यांनी प्रश्न त्यांनी विचारला आहे.
न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी या कारखान्याचे गत हंगामात घातलेल्या ऊसाचे 51 कोटी व कामगार यांचे 8 कोटी येणे बाकी असताना चेअरमन व संचालक खुशाल कोट्यवधी रुपयांचा गाडीत फिरत आहेत तर त्यांचेवर अपहार केलेचा ठपका असताना त्यांना अटक केली जात नाही तर उलट या चेअरमन व संचालक यांना काही राजकीय,व अधिकारी पाठीशी घालत असल्याने इथं लोकशाही मार्गाने 15 दिवस सुरू असलेले बेमुदत उपोषण मोडून काढण्यासाठी अनेक राजकिय मंडळी करीत असून आम्ही शेतकऱ्यांच्या पेमेंट साठी हे उपोषण सुरू केले आहे ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांचे पैसे द्या आम्हाला या मध्ये राजकारण करायचं नाही असे धनंजय महामुलकर यांनी सांगितले या वेळी उपोषण स्थळी महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले या वेळी मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे,तालुकाध्यक्ष नितीन यादव,मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत, अमोल सस्ते,डॉ.रविंन्द्र घाडगे,शंकर मुळीक,यांचेसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |