सातारा लोकसभा मतदारसंघात संभाव्य प्रमुख उमेदवारांनी निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने हातपाय हलवण्यास सुरूवात केली आहे. विकासकामे, सुखदु:खाचे प्रसंग अशा विविध निमित्ताने मतदारांशी संपर्क ठेवला जात आहे.
सातारा मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून याच पक्षाचे अधिराज्य राहिले असून येथील विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर चढाई करण्याचा शिवसेना तसेच भाजपचाही इरादा दिसत आहे. सध्यातरी काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच आंदण असल्याचे गृहित धरलेले दिसत आहे. उमेदवारी कोणाला हा विषय सर्वच पक्षांनी अधांतरी लटकत ठेवला असल्याने अखेरच्या टप्प्यात येथे अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे साताऱ्याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी सातारा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र तरीही स्वातंत्र्य चळवळीतील महान योध्दा क्रांतीसिंह नाना पाटील यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारीतून १९६२ साली हा बालेकिल्ला भेदला होता. नंतरच्या काळात १९९६ च्या निवडणुकीत शिवसेनेने या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून येथे भगवा फडकवला होता. शिवसेनेचे हिंदुराव नाईक - निंबाळकर येथून खासदार झाले होते. १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसने साताऱ्याचे तत्कालीन आमदार स्व. अभयसिंहराजे भोसले यांना रणांगणात उतरवून सातारा पुन्हा काबीज केला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये बेबंदशाही होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली.
काँग्रेसचे जिल्ह्यातील अनेक शिलेदार शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे अतोनात नुकसान झाले. १९९९ पासून आजअखेर सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचेच प्राबल्य आहे. पहिल्या दोन टर्म येथे लक्ष्मणराव पाटील खासदार होते. नंतरच्या दोन टर्म उदयनराजे भोसले खासदार आहेत. जिल्ह्यात पक्षाची ताकद पहिल्याइतकी राहिलेली नाही. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहापैकी तब्बल नऊ जागा राष्ट्रवादीने पटकावल्या होत्या. मतदारसंघ पुनर्रचनेत जिल्ह्यातील दोन मतदारसंघ कमी झाले. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ५ आमदार आहेत. कराड दक्षिण व माण - खटाव काँग्रेसकडे, तर पाटण शिवसेनेकडे आहे. राष्ट्रवादीचे अनिल देसाई, अमित कदम, महेश शिंदे यांच्यासारखे तरूण चेहरे भाजपमध्ये गेले आहेत. तेच आज पक्षाला आव्हान देत आहेत. भाजप अशांच्या जिवावर जिल्ह्यात पक्षविस्तार करू पहात आहे. खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला पक्षाच्या आमदारांचा विरोध आहे. उदयनराजे व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांच्यामधून विस्तवही जात नाही. मध्यंतरी त्यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला होता. रामराजे यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यादृष्टीने त्यांची चाचपणी सुरू आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचा सातारा मतदारसंघाचा आश्वासक चेहरा म्हणून श्रीनिवास पाटील यांचे नाव पुढे येत आहे. कराड लोकसभा मतदारसंघाचे दहा वर्षे प्रतिनिधीत्व केलेल्या श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमच्या राज्यपालपदाची कारकिर्द विशेषत्वाने खूप संस्मरणीय ठरली. त्यांचा पर्याय पक्षाकडे उपलब्ध आहे. शिवाय कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे. पण त्यांची लोकसभेत जाण्याची इच्छा दिसत नाही. उदयनराजे उमेदवार नको म्हणून राष्ट्रवादीत जोरबैठका होत असताना आपल्या दोन कार्यक्रमांना थेट मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांनी भाजपलाही चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याद्वारे त्यांनी पक्षातील विरोधकांना आपल्या कृतीने चोख प्रत्युत्तर देण्याची संधी सोडलेली नाही. सातारच्या उमेदवारीबाबत पक्षात एवढा गोंधळ सुरू असला तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या विषयावर चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय आहे याचा थांग कुणालाही लागत नाही.
सातारची उमेदवारी निर्विवादपणे उदयनराजे यांनाच असेही नाही आणि बदल होणार असेही नाही. खासदार उदयनराजे यांच्या विरोधात २००९ मध्ये शिवसेनेच्या उमेदवारीवर व २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष अशा दोन्ही निवडणुका लढवलेले व सध्या भाजपमध्ये असलेले पुरूषोत्तम जाधव यांची सातारा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपचा 'संपर्वâ फॉर समर्थन' हा फॉम्र्युला घेऊन संपूर्ण मतदारसंघात त्यांची जनसंपर्क मोहीम सुरू आहे. या अभियानासाठी सोशल मीडियाचा त्यांच्याकडून मोठा वापर होत आहे. शिवसेनेने या मतदारसंघावर यापूर्वी झेंडा फडकवला असून जिल्ह्यात शिवसेनेचे हक्काचे मतदान आहे. पुरूषोत्तम जाधव यांना दोन्ही निवडणुकात याच व्होट बँकेची साथ मिळाली होती. आता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा शिवसेनेचा निर्धार असून येथून शिवसेनेचा उमेदवार कोण असेल याविषयी मतदारांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. गतवेळी शिवसेनेचा उमेदवार नव्हता म्हणूनच शिवसेनेचा पाठीराखा वर्ग जाधव यांच्याकडे वळला होता. शिवसेनेचा उमेदवार असल्यावर हा पाठीराखा वर्ग पूर्ण ताकदीनिशी शिवसेनेच्याच कामी येणार आहे. सद्यस्थितीत लढतीतील सर्वच प्रमुख पक्षांनी 'थांबा व पहा'चे धोरण ठेवले आहे. या क्षणापर्यंत सर्व पक्षांनी उमेदवारीचा विषय अधांतरी लटकत ठेवला आहे. पहिली चाल कोण व काय करतो यावर नंतरच्या उलथापालथी होणार आहेत. त्यामुळेच अखेरच्या टप्प्यात येथे उमेदवारीच्या बाबतीत नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
...तर साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण ?
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आकारास येण्याची शक्यता आहे. त्याबाबतीत दोन्ही पक्षांमध्ये मतैक्य झालेले दिसत आहे. ही आघाडी झाल्यास आणि आघाडीच्या जागावाटपात सातारची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय झाल्यास येथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे उमेदवार असू शकतात. पण या मतदारसंघावर सलग वीस वर्षे पकड असलेला राष्ट्रवादी पक्ष सातारा सोडण्यास राजी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सध्या तरी हा जर तर चा विषय आहे. पृथ्वीराज चव्हाण सध्या काँग्रेसचे कराड दक्षिणचे आमदार असून स्वच्छ प्रतिमा व दमदार कामामुळे या मतदारसंघावर त्यांनी वर्चस्व निर्माण केले आहे.
- गजानन चेणगे
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |
शशिकांत शिंदे यांची बाळासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी भेट |