12:50am | Sep 04, 2018 |
कोरेगाव : आसरे, ता. कोरेगाव या पुनर्वसित गावच्या महिला ग्रामसेविकेस शिवीगाळ, दमदाटी दिल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस स्टेशनला तक्रार देवूनही संबंधित आरोपींना अटक होत नाही आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत आसरे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोरेगाव तालुक्यासह जिल्हा ग्रामसेवक संघटनेने घेतला. आसरे गावच्या महिला ग्रामसेविकेस झालेल्या दमदाटीचा, शिवीगाळीचा निषेध करण्यासाठी जिल्हा ग्रामसेवक संघटनेने कोरेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की 29 ऑगस्ट 2018 रोजी आसरे गावच्या ग्रामसभेत संघर्ष झाला होता. या पार्श्वभूमीवर आसरे गावच्या महिला ग्रामसेविका कल्याणी लोहार या आपल्या कार्यालयीन कामकाजाची माहिती देण्यासाठी कोरेगाव पंचायत समिती येथे आल्या होत्या. कार्यालयीन कामकाज संपूवन ग्रामसेविका सायंकाळी 5.30 वाजता पंचायत समितीतून घरी जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी पंचायत समितीच्या गेट समोर आसरे गावचे ग्रामपंचायत सदस्य रुपेश सपकाळ आणि त्यांच्या समवेत आलेले उदय चव्हाण, सुरेश इंगळे या आसरे गावच्या ग्रामस्थांनी ग्रामसेविका कल्याणी लोहार यांना दमदाटी केली तसेच शिवीगाळ केली. याबाबतची तक्रार कोरेगाव पोलीस स्टेशनला ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून समक्ष जावून कल्याणी लोहार यांनी तक्रार दाखल केली.
कोरेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होवूनही याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, आरोपी सुरेश सपकाळ, उदय चव्हाण, सुरेश इंगळे यांच्यावर अद्याप कोरेगाव पोलिसांनी कायदेशीर कारवाई केलेली नाही. याचा निषेध करण्यासाठी कोरेगाव सहित सातारा जिल्हा ग्रामसेवक संघटना रस्त्यावर उतरली. त्यांनी या घटनेचा निषेध केला. त्याचबरोबर सोमवार दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत आरोपींना अटक होवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी कोरेगाव पंचायत समितीसमोर धरणे धरले. संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय एकही ग्रामसेवक आसरे ग्रामपंचायतीचे कामकाज करणार नाही, असा एकमुखी निर्णय जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्यावतीने कोरेगाव पंचायतीसमोर केलेल्या धरणे आंदोलनात जाहीर करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत कोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी घारे, जगताप, जाधव, निकाळजे, लिपिक संघटनेचे गायकवाड, संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष धनंजय सस्ते, सारिका पवार यांसह कोरेगाव तालुक्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |