सातारा : शौक म्हणून एक- दोन नव्हे तर तब्बल चार दुचाकी चोरल्याप्रकरणी साधन घरातल्या एकाला सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलाने नुकतीच दहावीची परिक्षा दिली असून तो तारळी ता.पाटण येथील असल्याचे समोर आले आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात शहर पोलिस ठाण्याचे पोलिस गस्त घालत होते. यावेळी एक मुलगा दुचाकीवर निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला थांबवले. पोलिसांनी थांबवल्यानंतर मात्र त्या मुलाने दुचाकी तेथेच सोडून देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने पकडल्यानंतर त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली. यावेळी त्याने माहिती सांगितल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले.
संशयित अल्पवयीन मुलाने सातारा शहर परिसरातून तब्बल चार दुचाकी चोरल्याची कबुली देवून त्या दुचाकी ठिकठिकाणी लपवल्याची माहिती दिली. संशयिताने तारळे परिसरात रानात दोन दुचाकी आडबाजूला लावून लपवून ठेवल्या होत्या. याबाबत त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर चोरीच्या गाड्या सापडू नये व सगळीकडे फिरता यावे, यासाठी दुचाकी तारळी परिसरात लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी कुटुंबियांची माहिती घेतली असता ते सधन कुटुंब असल्याचे समोर आले असून मुलाला चोरीचे वाईट वळण लागल्याचे समोर आले आहे.
पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मुनीर मुल्ला, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, अशोक साळुंखे, जोतीराम पवार, सुनील भोसले, अनिल स्वामी, धिरज कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |