06:45pm | Apr 23, 2018 |
सातारा : पाटण तहसिलदारांच्या चुकीच्या कारवाईबाबत खडकी, ता. फलटण येथील एका वाळू व्यवसायिकाने सातारा जिल्हाधिकार्यांकडे लेखी तक्रार करुन महसूल विभागाच्या भोंगळ कारभाराचे धिंडवडे काढलेले आहेत. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांची वाळू वाहतुकीबाबत पावती असतानासुद्धा त्यांनाच चोर ठरवून पाटण तहसिलदार यांनी आपल्या अकलेचे तारे तोडल्यामुळे संपूर्ण सातारा महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रकाश बबन सुळ रा. खडकी, ता. फलटण यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. सध्या सातारा जिल्हा वाळू उपसा बंद असल्यामुळे परजिल्ह्यातून वाळू व्यवसायिक वाळू वाहतूक करीत आहेत. सध्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यात औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. फलटण, कराड, सातारा या मोठ्या शहरांमध्ये निवासी इमारतींची बांधकामेही मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. त्यामुळे वाळूची मागणी जास्त, आणि पुरवठा कमी असल्यामुळे जिल्ह्यात परजिल्ह्यातून वाळू मागवावी लागत आहे. प्रकाश सुळ हे सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील वाळू डंपरमध्ये भरुन सातारा जिल्ह्यात रितसर पावती घेवून पुरवठा करतात.
असे असताना दि. 27 मार्च रोजी प्रकाश सुळ व त्यांच्या डंपरचे चालक त्यांचा डंपर क्र. एमएच 11- एएल- 4876 मधून नेहमीप्रमाणे वाळू वाहतूक करीत होते. दरम्यान चिपळूण येथून पाटणमार्गे साताराकडे येत असताना पाटण तहसिलदार रामहरी भोसले यांनी संबंधित डंपर अडवला व त्यांनी डंपर चालकाकडे गौण खनिजाबाबत विचारणा केली. त्यावेळी चालकाने रॉयल्टी पावती व एनओसी पुस्तकाची पावती दाखवली. ही पावती गोवळकोट (ता. चिपळूण) येथील मंगेश जावळे यांच्याकडे रितसत गौण खनिजाची रॉयल्टी भरुन घेतलेली होती. तसेच 28 मार्चपर्यंत रात्री 1.31 पर्यंत त्या पावतीची मुदत होती. मात्र असे असतानाही तहसिलदार रामहरी भोसले यांनी बेकायदेशीरपणे आपल्या पदाचा गैरवापर करीत व रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करुन तोडपाणी करण्यासाठी सुळ यांची गाडी त्याठिकाणी अडवून ठेवली.
वास्तविक दि. 27 रोजी दुपारी 4 वाजता डंपर अडवून त्याचा पंचनामा 6 वाजता करण्यात आला. तसेच मूळ जबाबात खाडाखोड करुन पंचनाम्याची वेळी साडेसहा केली. त्यामुळे तहसिलदार रामहरी भोसले यांनी आपल्या पदाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करीत चुकीच्या पद्धतीने वाहतूक केली, असे खोटे दाखवून माझ्यावर 3 लाख 34 हजार 149 रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली आहे, असा आरोप सुळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेला आहे. तसेच माझा डंपर तहसिलदार भोसले यांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याने आता तो डंपर पाटण तहसिलदार कार्यालयात गेली 25 दिवस उभा असल्याने माझे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे. या कारवाईसंदर्भात तहसिलीदार रामहरी भोसले यांच्याकडे मी वेळोवेळी दाद मागण्यासाठी गेलो असता भोसले यांनी मला अपमानास्पद वागणूक दिली आहे. तसेच सांकेतिक भाषेतून माझ्याकडे त्यांनी पैशांची मागणी केली आहे.
तहसिलदार रामहरी भोसले यांच्या तुघलकी कारवाईमुळे माझे संपूर्ण कुटूंब आर्थिक व मानसिकदृष्ट्या कोलमडून गेले आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करुन पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन माझ्यावर आणि माझ्या परिवारावर अन्याय केलेला आहे. मला त्वरित न्याय न मिळाल्यास मी 1 मे या महाराष्ट्र दिनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण कुटूंबासह आत्मदहन करणार असल्याचा इशारा सुळ यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |