02:24am | Nov 28, 2019 |
कराड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील येथील कोल्हापूर नाक्यावर पुण्याकडे जाणार्या मार्गिकेवर तातडीने उड्डाणपूल व्हावा, या मागणीचे साकडे उड्डाणपूल कृती समितीच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना घालण्यात आले. या वेळी त्यामध्ये लक्ष घालून केंद्र सरकार स्तरावर त्याचा विचार करु, असे आश्वासनही पवार यांनी दिले.
पूणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येथील कोल्हाूर नाका हे शहराचे प्रवेशद्वार आहे. मात्र, कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणार्या मार्गावर येथे उड्डाणपूल नसल्याने महामार्ग जीवघेणा व धोकादायक बनला आहे. अनेकांना तिथे जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे नव्याने उकृाणपूलाचे काम सुरु व्हावे, तसेच पूणे-कोल्हापूर या मार्गावर सध्या असणार्या उड्डाण पुलावरुन दुहेरी वाहतूक सुरु व्हावी, या मागणीसाठी गेल्या आठवडयात येथे सर्वपक्षीय कोल्हापूर नाका उड्डाणपूल कृती समितीची स्थापना झाली आहे. या समितीची प्राथमिक बैठक नुकतीच झाली. त्यानंतर प्रांताधिकारी व पोलिस उपअधीक्षक यांच्यासमवेतही झालेली बैठक सकारात्मक झाली. शालेय विद्यार्थ्यांना उड्डाणपुलाच्या मागणीच्या लढयात सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्यानुसार शहरातील पालिका शाळांसह खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा, तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी कळकळीची विनंती या प्रार्थनेद्वारे कोल्हापूर नाक्यावर नवीन उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरु व्हावे, अशी मागणी केली. त्यानंतर कृती समितीच्यावतीने येथील वेणूताई चव्हाण सभागृहात उड्डाणपुलाच्या मागणीचे निवेदन पवार यांना देण्यात आले. यावेळी तेथे उकृाणपूल तातडीने व्हावा तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून उड्डाणपूलावरुन वाहतूक सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर पवार यांनी त्यामध्ये लक्ष घालून केंद्र सरकार स्तरावर त्याचा विचार करु, असे आश्वासन दिले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |