सातारा : जुन्या वादातून तीन युवकांचे अपहरण करुन त्यांना सदरबझार येथील आंब्याच्या बागेजवळ जिवे मारण्याच्या उद्देशाने दांडके, रॉड तसेच दगडाने मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी मंगेश बाबासाहेब ढाणे (वय २५ )रा. विकासनगर, सातारा व संजय सुखपाल सोलंकी (वय ४४) रा. सिव्हिल हॉस्पिटल कॉलनी, सदरबझार, सातारा या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमीर सलीम शेख (वय १७) रा. वनवासवाडी व त्याचे दोन मित्र अभिजित भिसे व शुभम बागडे या तिघांना जुन्या भांडणाच्या कारणातून दुचाकीवरुन अपहरण करुन त्यांना सदरबझार आंब्याच्या बागेजवळ नेवून दांडके, रॉड, दगडाने मारहाण करत अभिजित भिसे याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून नेले होते. नागरिकांच्या देखत हा प्रकार सुरु असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नागरिकांची गर्दी वाढू लागल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता.
याबाबत अमीर शेख याने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मनिष विश्वकर्मा, शुभम, शिवम रजपूत, उमेश गायकवाड, अमित सोळंकी, पुया, मंगेश ढाणे, तौफिक शेख याचा लहान भाऊ व इतर १० ते १७ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी मंगेश ढाणे व संजय सोळंकी या दोघांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. या गुन्हय़ाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे करत आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |