कराड : किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (केओईएल) या इंजिन्स, पॉवर जनरेटिंग युनिट्स व फार्म मॅकेनायझेशनच्या क्षेत्रातील आद्य व आघाडीच्या कंपनीने आपली के-कूल तंत्रज्ञान इंजिनांनी सुसज्ज अशी पॉवर टिलर्सची नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करण्याच्या आपल्या दृष्टीशी व वारशाशी सुसंगती राखत कंपनीने ही श्रेणी आणली आहे.
‘के-कूल’ तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या १२ एचपी व १५ एचपी क्षमतेच्या नवीन पॉवर टिलर्सच्या श्रेणीमध्ये अखंड काम करण्याची क्षमता आहे. याशिवाय, आरामदायी राइड-ऑन सुविधा व सेल्फ-स्टार्ट इंजिन आहेत. या उत्पादनाच्या दमदारपणामुळे तसेच खात्रीशीरतेची परिणती अधिक उत्पादनक्षमता व शेतकऱ्यांसाठी वाढीव उत्पन्नात होणार आहे.
‘किर्लोस्कर फार्म मशिनरी अॅट यूअर डोअर स्टेप कॅम्पेन’खाली पॉवर टिलर्स व पॉवर वीडर्स यांच्या या नवीन श्रेणीचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके सांगली जिल्ह्यातील विटा येथे करण्यात आली. प्रत्यक्ष शेतात केलेल्या प्रात्यक्षिकातून या यंत्राची २४ तास अखंड काम करण्याची क्षमता सर्वांपुढे आली. यातून शेतकऱ्यांनाही त्यांच्या खऱ्याखुऱ्या कामाच्या वातावरणात उत्पादन प्रत्यक्ष हाताळण्याची संधी मिळाली.
विराज शुगर्सचे अध्यक्ष श्री. वैभवदादा सदाशिव पाटीलजी यांनी यावेळी शेतीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवीन कृषी यांत्रिकीकरण तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. या सोहळ्यात शोरूम-ऑन-व्हील्स या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाची सर्व उत्पादने तसेच शेतात हाताने वापरण्याच्या उपकरणांची क्युबिक्स श्रेणी जवळून बघण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमाला सातारा व सांगली जिल्ह्यातील ५००हून अधिक शेतकरी, कर्मचारी व नेते उपस्थित होते. गावाच्या सरपंचांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
२४ तास संपताना, या प्रात्यक्षिकाने शेतकऱ्यांना उत्पादनाची खात्रीशीरता यशस्वीरित्या पटवून दिली. विक्री व डीलरशिपच्या संधींबाबत अनेकांनी रस दाखवला. शेतकऱ्यांसोबत काम करून त्यांना नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशी यंत्रे व सेवा पुरवण्याप्रती आपली बांधिलकी किर्लोस्कर कृषी यांत्रिकीकरण टीमने व्यक्त केली.
किर्लोस्कर ऑइल इंजिन्समधील कृषी यांत्रिकीकरण विभागाचे व्यवसाय प्रमुख प्रमोद एकबोटे यांनी के-कूल तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर स्पष्ट करून सांगितले आणि ते म्हणाले, “आमच्या उत्पादनांचे संदर्भमूल्य व कामगिरी कमाल पातळीवर नेण्यासाठी शेतकऱ्यांच्या गरजा व त्यांना होणारे त्रास समजून घेण्याची परंपरा किर्लोस्करमध्ये आहे. प्रात्यक्षिकांसाठी वापरण्यात आलेला मेगा टी१२ हे आमच्या विचारसरणीचे चपखल उदाहरण आहे. भारतात प्रथमच या यंत्राने शेतकऱ्यांना सेल्फ-स्टार्ट पर्याय दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुविधा मिळणार आहे. हे यंत्र नियमित फॅक्टरी फिटमेंट म्हणून आसन पुरवून शेतकऱ्याचा आराम व सुरक्षितता यांचीही काळजी घेते. या दोन्ही बाबी उद्योगक्षेत्रात प्रथमच दिल्या जात आहेत. ज्या शेतकऱ्यांना अधिक शक्ती हवी आहे त्यांनी आमच्या याच सर्व सुविधा देणाऱ्या १५ एचपी टिलर्सचा पर्याय निवडावा.”
सातत्यपूर्ण व सक्रिय नियोजन तसेच धोरणात्मक उपाय यांमुळे आम्ही सर्वांत भरवशाची तसेच खात्रीशीर इंजिनीअरिंग सोल्यूशन पुरवणाऱ्या कंपन्यांपैकी एक झालो आहोत. के-कूल इंजिन यापुढे देशभरातील शेतीच्या पद्धतीत क्रांती घडवून आणणार आहे आणि निर्यात बाजारपेठेतही या तंत्रज्ञानाबद्दल बराच रस निर्माण झाला आहे. येत्या काही वर्षांत किर्लोस्कर ऑइल इंजिन्स एकाचवेळी नवीन विस्तार योजना राबवणार आहे, तसेच आपल्या मानाच्या ग्राहकांचे हित साधण्यासाठी अधिक दमदार संशोधन व विकास व्यासपीठेही तयार करत आहे.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोहम भोईटे प्रथम |
शिंगणापूर रोडवर ट्रीपल सीट दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक |
‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांचे अपघातात निधन |
राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला! |
भटक्या विमुक्त जमाती संघटना दि. १५ ऑगस्ट रोजी काढणार झेंडा रॅली |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
सातारा येथे वीर पत्नींचा सन्मान |
सातारा जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार! |
महाराष्ट्रात विकास कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी : शंभूराज देसाई |
सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची खा. उदयनराजे यांची मागणी |
औषध निर्माण क्षेत्रात संशोधनात्मक मनुष्यबळाची नितांत गरज |