05:28pm | May 25, 2022 |
मुंबई : ऑनलाईन अॅपद्वारे होणाऱ्या अर्थिक व्यवहारामध्ये सध्या वाढ झाली आहे. इंटरनेटद्वारे मोबाइलची हाताळणी करताना अनेक जाहिराती येत असतात. त्यात एका क्लिकवर ऑनलाइन कर्ज, अशा जाहिराती सातत्याने दिसतात. या जाहिरातीला क्लिक केले की ते संबंधित अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. अशा बोगस लोन अॅपच्या माध्यामातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महाराष्ट्र सायबर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात गुगल प्ले स्टोरला पत्र लिहित अशी बोगस अॅप प्ले स्टोरमधून कढून टाका किंवा डिलीट करा अशी सूचना केली आहे.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुगल प्ले स्टोरला पत्र
डिजिटल बॅंकिंग किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्थिक व्यवहार करताना फसवणुकीचे किंवा फ्रॉडचे प्रकारदेखील वाढले आहेत. कर्ज देणारे अनेक अॅप (Loan App) हे बनावट असतात आणि त्यांचा हेतू लोकांना फसवणे हाच असतो. अशा 13 बोगस अॅपची यादी हाती लागल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुगल प्ले स्टोरला एक पत्र लिहले आहे. संबंधित 13 अॅप तुमच्या नियम व अटींची पुर्तता करत नसतील तर त्या अॅपना तुमच्या प्ले स्टोरमधून काढून टाका अथवा डिलीट करा अशी सूचना केली आहे. दरम्यान अशा प्रकारचे आणखी 18 अॅप सायबर पोलिसांच्या स्कॅनर खाली आले असून त्या अॅप्स बाबत सायबर पोलिस गुगलला लवकरच पत्र लिहणार आहे.
1829 कर्ज फसवणुकीच्या ऑनलाईन तक्रारी
महाराष्ट्र सायबर पोलिसांना सुमारे 1829 कर्ज फसवणुकीच्या ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र सायबरकडे तक्रार आल्यानंतर डॉ. ते स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देतात. त्यानुसार आजपर्यंत तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. सुमारे 9 नॉन कॉग्निझेबल (NC) प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सायबर गुन्ह्याची तक्रार लोक 1930 या हेल्पलाइन नंबरवर करू शकतात किंवा त्यांची ऑनलाईन तक्रार cybercrime.gov.in वर नोंदवण्याचे आवाहन, महाराष्ट्र सायबर पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी ही माहिती दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |