12:55pm | Oct 31, 2022 |
नवी दिल्ली : आगामी दोन महिन्यांत होणाऱ्या गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या रूपाने ५४५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. निवडणूक रोख्यांच्या विक्रीची २२ वी फेरी १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. त्यातून या देणग्या मिळाल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (एसबीआय) असलेल्या तपशिलातून दिसून येते.
निवडणूक रोख्यांच्या योजनेची २०१८ साली सुरुवात झाली. तेव्हापासून या रोख्यांच्या रूपाने राजकीय पक्षांना आजवर १०,७९१ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. यंदाच्या जुलै महिन्यापर्यंत निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना ३८९.५० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात निवडणूक रोख्यांच्या विक्रीतून राजकीय पक्षांना किती देणग्या मिळाल्या याचा तपशील एकाही राजकीय पक्षाने अद्याप उघड केलेला नाही.
निवडणूक रोख्यांच्या रूपाने राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांच्या तपशिलाबद्दल लोकेश बात्रा यांनी माहितीच्या अधिकाराखाली एसबीआयकडे विचारणा केली होती. त्या अर्जाला दिलेल्या उत्तरात एसबीआयने देणग्यांच्या रकमांबाबतची माहिती दिली आहे. निवडणूक रोख्यांची विक्री करण्याचा अधिकार फक्त एसबीआयलाच देण्यात आला आहे. त्यातील देणगीदारांची नावे उघड करण्यात येत नाहीत.
लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये नोंदणी झालेले तसेच आधीच्या लोकसभा वा विधानसभा निवडणुकांत १ टक्क्याहून अधिक मते मिळविलेले राजकीय पक्षच निवडणूक रोख्यांद्वारे देणगी मिळविण्यास पात्र ठरतात. निवडणूक रोख्यांच्या योजनेला आव्हान देणाऱ्या एका याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने ६ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |