01:17pm | Mar 04, 2021 |
नवी दिल्ली: भारताचा विस्फोटक फलंदाज युवराज सिंग याच्या नावावर असलेल्या विक्रमाशी पॉलार्डने तब्बल 14 वर्षांनंतर बरोबरी केली आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असणार्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये कर्णधारपदाला साजेशी खेळी करत पॉलार्डने एकाच षटकात 6 उत्तुंग षटकार खेचले.
वेस्ट इंडिज संघाने हा सामना सहज खिशात घातला. पोलार्डने अकीला धनंजयच्या एक षटकामध्ये सहा षटकार लगावले. या पराक्रमबरोबरच पोलार्डने युवराज सिंग, हर्शल गिब्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. युवराज आणि गिब्स दोघांनाही एकाच षटकामध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. युवराजने टी-20 तर गिब्सने एकदिवसीय सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय.
पोलार्डने विंडीज संघाची फलंदाजी सुरु असतानाच पाचव्या षटकामध्येच हा पराक्रम करत विक्रमी कामगिरी केली. पोलार्डने 11 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चेंडूत सहा षटकांरांचा समावेश होता. विशेष गोष्ट म्हणजे पोलार्डने हे सहाही षटकार मैदानाच्या वेगवेगळ्या दिशांना मारण्याऐवजी सरळ मारले. पोलार्डने युवराज सिंगच्या टी-20 मधील विक्रमाची बरोबर केली आहे. तब्बल 14 वर्षांनंतर कोणत्याही खेळाडूला या विक्रमाची बरोबर करण्यात यश मिळालं आहे.
विशेष म्हणजे वेस्ट इंडिजचे चार फलंदाज तंबूत परतल्यानंतर पोलार्ड मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरला होता. लेंडल सिमन्स 26 धावा, एविन लुईस 28 धावा यांनी चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर क्रिस गेल आणि निकोलस पूरन भोपळाही न फोडता तंबूत परतले. त्यानंतर पोलार्डने वेस्ट इंडिज संघाच्या विजय मिळवून देत तीन सामन्यांच्या मालिकेमधील पहिली सामना जिंकला.
पोलार्डने सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याची कामगिरी करत क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा तिसरा खेळाडू होण्याचा विक्रम स्वत:च्या नावे केलाय. यापूर्वी भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने 2007 च्या आयसीसी वर्ल्ड टी-20 मध्ये इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकामध्ये सलग सहा षटकार लगावले होते. युवराजच्या आधी दक्षिण आफ्रीकेचा नावजलेला फलंदाज हर्षल गिब्सने त्याच वर्षी म्हणजेच 2007 साली एकदिवसीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. गिब्सने नेदरलॅण्डविरोधातील सामन्यामध्ये डान वैन बुंगेच्या गोलंदाजीवर एकाच षटकात सहा षटकार लगावले होते. सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावणारा पोलार्ड हा पहिलाच वेस्ट इंडियन खेळाडू ठरलाय.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |