09:35pm | Mar 20, 2021 |
वाई : वणवा लावण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी रेनावळे (ता. वाई) येथील जिल्हा परिषदे शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षिकेला प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा वाई न्यायालयाने आज सुनावली.
शिवाजी लक्ष्मण पार्टे (रा.वेलंग ता. वाई) व नलिनी गणेश खरात (रा. शिरगाव ता. वाई) अशी संशयितांची नावे आहेत. पार्टे हे मुख्याध्यापक, तर खरात या शिक्षिका म्हणुन काम करतात. रेनावळे येथील राखीव वनक्षेत्रास २६ फेब्रुवारी २०२१ रोजी वनवा लागला होता. वनाधिकारी व कर्मचार्यांनी परिश्रमपुर्वक हा वणवा विझवला होता. शिवाजी पारटे व निलीमा खरात यांनी रेनावळे गावातील शाळेजवळ कचरा व कागद पेटवून दिले होते. या कचर्यातील कागद व पालापाचोळा वार्याने उडून शेजारच्या मालकी क्षेत्रात पडल्याने तेथील गवताने पेट घेतला. ही आग जवळच्या वनक्षेत्रात पसरली. या आगित वनक्षेत्रातील २२ हेक्टर वनक्षेत्र जळून शासनाचे ११ हजार रूपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी भारतीय वनअधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वनपाल भाऊसाहेब कदम व प्रभारी वनपाल रत्नकांत सिताराम शिंदे यांनी केला. आरोपींविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. वन गुन्ह्यातील दोन्ही संशयितांनी वाईचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.आर. माळी यांच्यासमोर गुन्हा कबुल केला. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी ५ हजार रुपये दंड व दंड न भरलेस २० दिवसांची साधी कैद ही शिक्षा सुनावली. आरोपींनी एकूण १० हजार रुपये दंड न्यायालयात भरला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |