07:40pm | Sep 22, 2021 |
सातारा : रिपाइं एचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर पक्षाचा झंजावात सुरु आहे. पक्षाची विचारधारा राज्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि रुजवण्यासाठी कार्यकर्ते झटत आहेत. कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून पक्ष विस्तार केला जात आहे. जिथे अन्याय असेल तेथे रिपाइंचा प्रहार होईल, सामान्यांच्या हक्कासाठी रिपाइंचा निळा झेंडा दीपकभाऊंच्या मार्गदर्शनाखाली उंचावत राहू, असा विश्वास रिपाइं ए चे राज्याचे उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी व्यक्त केला.
मुंबई येथे रिपाइं ए च्या राज्यव्यापी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यातून महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, महाराष्ट्र सचिव अशोक ससाणे, कार्यालयीन अध्यक्ष तानाजी मिसळे, सेक्रेटरी रमेश भोईर, युवक प्रदेशाध्यक्ष अमित वर्मा, युवकचे मुंबई अध्यक्ष अक्षय निकाळजे, मुंबई प्रभारी सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. याच बैठकीत दीपकभाऊ निकाळजे यांनी दादासाहेब ओव्हाळ यांची राज्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबाबतचे त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल सातारा जिल्हा रिपाइं ए मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिपाइं ए चे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हळ या निवडीबाबत बोलताना म्हणाले, रिपाइं ए हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा एकमेव पक्ष आहे. निळय़ा झेंडय़ाखाली भिम चळवळीची मोट बांधलेला हा पक्ष राज्यातील प्रत्येक गावांमध्ये दीपकभाऊंच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पोहचवला आहे. सर्वसामान्यांना त्यांचे मुलभूत हक्क मिळावेत, दलितांवरील वाढते अत्याचार-अन्याय थांबावेत, त्यांना त्यांचा मुलभूत हक्क मिळावा, यासाठी रिपाइं ए चा कार्यकर्ता झटत असतो. लढत असतो. प्रशासनासोबत दोन हात करत असतो. न्यायासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलने करतो. रिपाइं ए ची विचारधारा गावगावी, वाडीवस्तीवर पोहचवली गेली आहे. वाडीवस्तीवरील सर्वसामान्य कार्यकर्ता रिपाइं ए च्या चळवळीत सहभागी होवू लागलेला आहे. न्याय हक्कासाठी लढू लागला आहे. दीपकभाऊंच्या मार्गदर्शनाखाली रिपाइं ए राज्यात प्रभावीपणे वाढवणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबाबत रिपाइं ए चे सातारा जिह्यातील मदन खंकाळ, सोमनाथ धोत्रे, विक्रम वाघमारे, संजय गायकवाड, संजय कांबळे, मुकुंद माने, मदन खंकाळ, राम मदाळे, संतोष जाधव, संतोष ओव्हाळ, बाबा ओव्हाळ, जयवंत कांबळे आदींनी अभिनंदन केले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |