03:00pm | Mar 05, 2022 |
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युध्द शिगेला पोहोचले आहे. यामुळे भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यात बहुतांश विद्यार्थी हे मेडिकलचे आहेत. मात्र, युक्रेनमधील परिस्थिती पाहता येथील मेडिकलचे शिक्षण सोडून आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. मेडिकलच्या परीक्षा आणि इंटर्नशिप सोडल्यामुळे आता पुढे काय करायचे असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडलाय. त्यामुळे भारत सरकारने यावर योग्य दिशेन पावले उचलण्याची मागणी केली जात होती. त्यावर आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करत युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने शनिवारी एक परिपत्रक जारी केले आहे. जे युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या परिपत्रकानुसार, युद्ध आणि कोरोनाच्या स्थितीमुळे अनेक विद्यार्थी परदेशातून शिक्षण सोडून भारतात आले आहेत. त्यांचे भविष्य उध्वस्त होऊ नये म्हणून भारतात त्यांना इंटर्नशिप पूर्ण करता येईल. परदेशात वैद्यकीय पदवी शिक्षण (Foreign Medical Graduates) घेतलेल्या विद्यार्थ्यांना अपूर्ण राहिलेली इंटर्नशिप भारतात पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अर्ज करण्याची परवानगी दिली आहे.
भारतात इंटर्नशिपचा उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी त्यांचा अर्ज ग्राह्य मानला जाईल. परंतु, यासाठी त्यांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) पास करणे आवश्यक आहे. FMGE परीक्षा ही खास परदेशी विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते जे परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येतात. या परीक्षेत कोणी नापास झाल्यास, त्याला इंटर्नशिप आणि सराव करण्याची परवानगी नाही. यामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्याच्या नियमांनुसार, परदेशातील विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग टेस्ट पास करावी लागते. यानंतर त्यांना भारतीय मेडिकल ग्रॅज्युएट समकक्ष म्हणून मान्यता मिळते. त्यामुळे भारतात त्यांना प्रॅक्टिस करता येते, परंतु परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयात मायग्रेशनची परवानगी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमात नाही. त्यामुळे युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनत आहे.
भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अभ्यासासाठी का जातात?
भारतातून युक्रेनमध्ये अभ्यासासाठी जाणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. इथे लाखो मुले वैद्यकीय परीक्षेला बसतात मात्र सरकारी महाविद्यालयांमध्ये जागा फक्त हजारात आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. एखाद्या विद्यार्थ्याला खासगी महाविद्यालयातून 5 वर्षे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करायचे झाल्यास 1.25 कोटींचा खर्च येतो. त्यामानाने युक्रेन या देशात वैद्यकीय शिक्षण अत्यंत स्वस्त आहे. एमबीबीएसचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी युक्रेनमध्ये दरवर्षी सुमारे 3800 ते 4000 डॉलर्स खर्च येतो.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |