कराड : कराडच्या कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल रविवारी पाडण्यास सूरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकीबाबत सातारा जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. हा उड्डाणपूल शनिवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच दि. 5 फेब्रुवारी रात्री 12 वाजलेपासून पाडण्यात येणार असल्याने त्यावेळीपासून वाहतूक वळविण्यात येणार आहे. पूल पाडण्याचे काम 25 मार्चपर्यंत चालणार आहे. त्यामुळे वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.
1) कोल्हापुर कडुन सातारा बाजुकडे जाणारी वाहतुक मलकापूर पूल ज्या ठिकाणी कराड बाजूस संपतो त्या ठिकाणापासुन सर्व्हिस रस्त्यावर वळविण्यात येणार आहे.
2) कोल्हापूर बाजूकडून कराडात येणारी वाहने हि एकेरी वाहतुकीने वारुंजी फाटा पाटण तिकाटणे पर्यंत येऊन जड वाहतुक हि सर्व्हिस रोड कोयना पूल व हॉटेल पंकज समोरुन सर्व्हिस रोडने महात्मा गांधी पुतळयासमोरुन कराडात जातील व हलकी वाहने ही जुन्या कोयना पूलावरुन कराड शहरात जातील.
3) कराड शहरामधुन कोल्हापुर नाका येथे बाहेर पडणाऱ्या वाहनासाठी- अ) कोल्हापुरकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोडचा वापर करुन जाता येईल. ब) कराडातून सातारा कडे जाणारी वाहने भादी हार्डवेअर समोरुन उजवीकडे महामार्गावरील वळण मार्गातून यु-टर्न घेवुन नंतर खरेदी विक्री पेट्रोलपंपासमोरील सर्व्हिस रोडवर जातील.
4) सातारा बाजूकडून कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक हॉटेल पंकज समोरुन वळण मार्गातून कोल्हापुर सातारा लेनवर वळविण्यात येईल व कोल्हापुर नाक्यावरील पूल संपल्यानंतर महामार्गावरील वळण मार्गातून सर्व्हिस रोडने एकेरी मार्गाने घेण्यात येईल. कृष्णा हॉस्पिटल समोरील पुल संपल्या नंतर गंधर्व हॉटेलजवळ वाहतुक पुर्ववत महामार्गावर घेण्यात येईल.
5) सातारा कडून कोल्हापुरकडे (वारूंजी फाटा ते गंधर्व हॉटेल) व कोल्हापुर कडुन सात्ताराकडे (कोयना वसाहत ते वारुंजी फाटा) जाणारी वाहतुक हि एकेरी वाहतुक असलेने विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच सदर मार्गावर कोणतेही प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
6) कराड बाजुकडुन ढेबेवाडीकडे जाणारी वाहतुक हि कोल्हापुर नाका ते ढेवेवाडी फाटा पर्यंत एकेरी मार्गाने ढेबेवाडी फाटापर्यंत जावुन पूलाखालून ढेबेवाडीकडे जाईल.
7) ढेबेवाडी बाजुकडुन कराड शहराकडे येणारी वाहतुक हि ढेबेवाडी फाटा येथुन सर्व्हिस रोडने वारुंजी फाटा मार्गे कराडमध्ये येईल.
8) जड वाहतुक (ओडीसी वाहने) हि फक्त रात्रीच्या वेळी वाहतुकीस परवानगी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
वरील प्रमाणे सदर ठिकाणचे उड्डाणपूल पाडण्याचे काम व नवीन सहापदरीकरण उड्डाणपुलाचे काम करण्याच्या वेळी वाहतूक वळवण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत असून वरील प्रमाणे कराड मधील वाहतूक मार्गातील बदलासाठी नागरिकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी केले आहे.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |