10:43pm | May 24, 2023 |
सातारा : स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातारा शहरात दरवर्षीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदा 350 वा शिवराज्याभिषेक दिन असल्याने शिवप्रेमींनी एकत्र येऊन दि. 27 में ते 2 जून या सप्ताहाचे आयोजन केले आहे. यात व्याख्यान, दुचाकी रॅली, पोवाडा, वृक्षारोपण आणि भव्य मिरवणुक असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे अध्यक्ष राजू गोरे, स्वागताध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष हरिष पाटणे, उपाध्यक्ष अमोल मोहिते आणि पदाधिकार्यांनी पत्रकार परिषेदत दिली.
श्री. छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक ऐतिहासिक घटना असून त्याला अनेक कंगोरे आहेत. यंदाचा शिवराज्याभिषेक हा 350 वा असून तो तिथीप्रमाणे 2 जून रोजी आहे. सातारा शहरात गेल्या 20 वर्षांपासून शिवराज्याभिषेक दिन दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. यावर्षी 350 वा शिवराज्याभिषेक दिन असल्याने श्री शिवराज्याभिषेक दिन समिती आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नवीन पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावते यादृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता व्याख्यनाने होणार आहे. किल्ले अंजिक्यतारा येथील राजसदरेवर प्रसिध्द लेखक, पानिपतकार डॉ. विश्वास पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी सातारा-जावलीचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आहेत. याप्रसंगी सयाजी चव्हाण, रेणू येळगावकर, फिरोज पठाण, आनंदराव कणसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रविवार दि. 28 जून रोजी सायंकाळी 6 वाजता 350 मशालमहोत्सव आणि महाआरती शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते शिवतीर्थ, पोवई नाका येथे होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले असून दै. सकाळचे राजेश सोळस्कर, दै. लोकमतचे दीपक शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. सोमवार दि. 29 मे रोजी सकाळी 8 वाजता सातारा नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने 350 रोपांचे वृक्षारोपण तामजाईनगर, शाहूनगर परिसरात करण्यात येणार आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे, युवा उद्योजक विक्रम पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी शैलेंद्र पळणिटकर, श्रीकांत कात्रे, चंद्रसेन जाधव, सनी शिंदे, प्रशांत जगताप यांची उपस्थिती असणार आहे.
मंगळवार 30 मे रोजी सातारा शहरातून 350 दुचाकीवरुन भव्य शोभायात्रा सायंकाळी 6 वाजता काढण्यात येणार आहे. शिवतीर्थ पोवई नाक्यावरुन भगवे ध्वज धारी मावळ्यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. प्रमुख उपस्थिती खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांची असणार आहे. यावेळी सागर पावसे, सागर भोसले, विवेक निकम, दै. पुढारीचे जीवनधर चव्हाण, साम मराठीचे ओंकार कदम यांची उपस्थिती असणार आहे. बुधवार दि. 31 मे रोजी सायंकाळी 6 वाजता गांधी मैदानावर व्याख्यान होणार आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान होणार असून प्रमुख उपस्थिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, भाजप राज्य उपाध्यक्ष माधव भंडारी यांची असणार आहे. यावेळी मनोज शेंडे, शरद काटकर, राहुल तपासे, तुषार तपासे, संग्राम बर्गे यांचीही उपस्थिती असणार आहे.
गुरुवार दि. 1 जून रोजी ऐतिहासिक पोवाडा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता गांधी मैदान येथे होणार आहे. यावेळी झीटीव्ही फेम शाहीर देवानंद माळी, सांगली यांचा पोवाडा होणार असून उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत बापट यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शुक्रवार दि. 2 जून 350 वा शिवराज्याभिषेक दिन असून त्यानिमित्त शिवतीर्थावरील शिवमूर्तीस महाअभिषेक करण्यात येणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पारंपारिक भव्य मिरवणुक काढण्यात येणार असून त्यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. गांधी मैदानासून ही मिरवणूक सुरु होणार असून गांधी मैदान ते कमानी हौद, शेटे चौक मार्गे शिवतीर्थ पोवई नाका येथे मिरवणूक येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले आहे.
350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केलेल्या या सर्व कार्यक्रमांना सातारकरांनी, शिवप्रेमींनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष राजू गोरे, स्वागताध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष हरिष पाटणे, उपाध्यक्ष अमोल मोहिते, कोअर कमिटीचे रवींद्र माने, अमर बेंद्रे, रवींद्र भारती झुटींग, नंदकुमार सावंत, अनिरुध्द जोशी, जयंत देशपांडे, अभिजीत बारटक्के, अंजिक्य गुजर, सतीश ओतारी, अशोक रेमजे, उमेश जगताप आणि सदस्यांनी केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |