08:25pm | Mar 18, 2022 |
कराड : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरातील बैलबाजार येथे आयोजित कुस्ती स्पर्धेला कुस्ती प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, अधिकराव चव्हाण, राहुल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी भास्कर देवकर, धनाजी काटकर, इंद्रजीत गुजर, नानासाहेब पाटील, नितीन थोरात, शिवाजी मोहिते आदींसह सर्व कुस्तीप्रेमी उपस्थित होते. या कुस्ती पाहण्यासाठी कराड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी बैलबाजार ग्राउंडवर उपस्थित होते.
अधिकराव चव्हाण म्हणाले, आपल्या भागात कुस्तीबद्दल आस्था निर्माण व्हावी, यासाठी अशा कुस्त्यांच्या स्पर्धांचे आयोजन केले पाहिजे. आज इथे नंबर १ च्या कुस्तीसाठी २ कुस्त्या लावल्या गेल्या होत्या. यामध्ये अक्षय मोहिते (बेलवडे बुद्रुक) व दिग्विजय जाधव (सुपने) हे दोघेही नंबर १ च्या कुस्तीमध्ये विजयी झाले आहेत. तसेच महिलांच्या कुस्तीला सुद्धा कुस्तीप्रेमींनी दाद दिली. यामध्ये मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील व सध्या शिवछत्रपती कुस्ती केंद्र सुपने येथे कुस्तीचा सराव करत असलेली अमृता चौगुले ही खेळाडू विजयी झाली आहे.
ते म्हणाले, लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत तसेच महिलांमध्ये सुद्धा कुस्तीबद्दल आस्था निर्माण व्हावी, यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला कराड तालुक्यातून असंख्य कुस्तीप्रेमींनी हजेरी लावून चांगली दाद दिली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |