10:31pm | Nov 17, 2020 |
सातारा : मंगळवारी जिल्ह्यात 94 बाधित निष्पन्न झाले, तर 3 बाधितांचा मृत्यू झाला. तसेच 231 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 516 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात मंगळवारी 3 बाधितांच्या मृत्यूने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 1 हजार 646 वर पोहोचली आहे. तसेच 94 बाधित निष्पन्न झाल्याने एकूण बाधितांचा आकडा 49 हजारांचा टप्पा ओलांडत 49 हजार 51 वर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 231 नागरिकांना कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 44 हजार 974 वर पोहोचली आहे. यामुळे जिल्ह्यात 2 हजार 337 बाधितांवर उपचार सुरु असून 516 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
3 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दिव्यनगरी ता. सातारा येथील 90 वर्षीय पुरुष, राणंद ता. माण येथील 54 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये चिंचणेर वंदन ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
516 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 46, कराड येथील 36, फलटण येथील 31, कोरेगांव येथील 43, वाई येथील 15, खंडाळा येथील 24, रायगांव येथील 91, पानमळेवाडी येथील 62, मायणी येथील 29, महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 18, दहिवडी येथील 28, खावली येथील 5, पिंपोडा येथील 12, तरडगाव येथील 26, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 45 असे एकूण 516 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |