पुसेगाव: काटेवाडी (ता.खटाव) गावातील एक दोन रुग्णांनंतर आता काटेवाडी हे संपूर्ण गावाला युवकांच्या धाडसामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळत आहे. या गावातील दोन युवक स्वतःची जीवाची बाजी लावून अनेकांना तपासणीसाठी सातारा शहरात घेऊन येत आहेत. तेथे त्यांची तपासणी झाल्यानंतर पुन्हा काय हवे काय नको याची विचारणा करतात. युवकांमधील घडणारे तिच्या माणुसकीच्या दर्शनाने ग्रामस्थांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात.
काटेवाडी (ता.खटाव) हे गाव सध्या हॉटस्पॉट झोनमध्ये गेलेले आहे. गेल्या आठ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 29 पोहोचली असून, दोन रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थ हादरले आहेत. गेल्या आठवड्यात एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील तब्बल 13 व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्या. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. दुसर्या दिवशी पुन्हा 80 लोकांचा कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यात पुन्हा पाच व्यक्ती बाधित सापडल्या. श्वसनाचा त्रास होणार्या चार रुग्णांना सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल रुग्णांस बाधित रुग्णांची संख्या 29 वर पोचली प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले.
दरम्यान काल सातारा येथे उपचार घेत असलेले एक व घरी उपचार घेत असलेला एका वृद्ध व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू झालेने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ प्रचंड तणावाखाली आहेत. घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यांना मानसिक आधाराची खरी गरज असून, गावातील गणेश कचरे, पृथ्वीराज पाडेकर, सरपंच बाळासाहेब जगदाळे, सोनाली सस्ते, अंगणवाडी सेविका मनीषा काटकर, आशा जगदाळे, शुभांगी कर्णे रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच गरजूंना औषधे व गरजेचे साहित्य पुरवून त्यांच्या वेळोवेळी तपासणी करीत आहेत.
युवकांच्या धाडसाचे कौतुक
गणेश कचरे हा धडपड्या युवक जिवाची बाजी लावून अनेक रुग्णांना एचआरसिटी तपासणीसाठी सातारा येथे नेऊन त्यांच्या तपासण्या करीत आहे. त्याच्या या धाडसामुळे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे. पृथ्वीराज पाडेंकर रुग्णसेवा करत माणुसकीचे दर्शन घडवीत आहेत. पोलीस प्रशासनामार्फत सहाय्यक निरीक्षक चेतन मछले तर महसूल प्रशासनामार्फत तलाठी गणेश बोबडे काटेवाडी येथे मदत कार्य करण्याचे काम करत आहेत.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |