वाई : येथील बसस्थानक परिसरात वाई-पाचगणी रस्त्यावर किसन वीर महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. विशेष म्हणजे वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या घराच्या गेटजवळ २५ ते ३० तरुणांमध्ये फिल्मीस्टाईल हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. सतत विद्यार्थ्यांच्या हाणामारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने यावर निर्बंध घालण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी स्थानिक नागरिक व व्यावसायिक करीत आहेत.
वाई बसस्थानक व सायली हॉटेल परिसरात किसन वीर महाविद्यालयातील तरुणांच्या दोन गटात वादविवाद हाणामारीच्या घटना वारंवार घडत आहेत. कधी शाब्दिक, लाथा बुक्क्यांनी, तर कधी दगडी व काठ्या यांचा वापर करून हाणामारी होत असते. तसेच गावांची व धार्मिक देवी-देवतांच्या नावाचा जयघोष देखील सुरूच असतो. वाई-पाचगणी रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. काहीवेळा पर्यटकांच्या वाहनांची देखील तोडफोड झाली आहे. महाविद्यालयाच्या वेळेत कर्णकर्कश करणाऱ्या बुलेट व इतर वाहनाचा वापर करून तरुणींची छेड काढण्याचे प्रकार देखील घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनी, स्थानिक नागरिकांसह रस्त्यालगतचे छोटे व्यावसायिक यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. काही प्रमाणात नुकसानही सहन करावे लागते. पोलीस प्रशासनाने वाई शहर व महाविद्यालय मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र हाणामारी करणारे तरुणांचे गट सीसीटीव्ही आड दुसऱ्या गटाला अडवून वाहने आडवी मारून फिल्मी स्टाईल हाणामारी करीत आहेत. पोलिसांनी या रोडरोमिओंचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |