05:51pm | Sep 22, 2021 |
सातारा : सातारा शहराचे उपनगर असणार्या करंजे परिसरात मेहेर कॉलनीत प्रस्तावित बागेच्या कामाचा एकीकडे नारळ फुटला तर दुसरीकडे सय्यद कॉलनी येथील महिलांनी पाण्यासाठी रास्ता रोको केल्याने येथील वाहतुकीचा अर्धा तास खोळंबा झाला. शहराच्या एकाच भागात विकास कामांचा धडाका आणि नागरिकांची होणारी असुविधा यांचे परस्पर विरोधी चित्र पहायला मिळाले.
सातारा नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेउन आता खासदार उदयनराजे भोसले यांची विकासकामांच्या माध्यमातून राजकीय बांधणी सुरू झाली आहे. करंजे भागातील सर्वे नं 413 येथे नगरोत्थान योजनेअंर्तगत दीड कोटी रुपये खर्च करून प्रशस्त उद्यान क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय पोवई नाक्यावरील शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करून येथील रस्त्याच्या कामाचे सुध्दा त्यांनी भूमीपूजन केले. या दोन्ही कार्यक्रमास नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, ऍड दत्ता बनकर, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे उपस्थित होते.
नागरिकांना मुलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. करंजे भाग आणि हद्दवाढीचा नवीन भाग येथे कोणत्याही सुविधा आणि त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही खासदार उदयनराजे यांनी देत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या कामाच्या झपाट्याचे कौतुक केले.
करंजेत विकास कामांचे नारळ फुटल्यावर काही वेळातच सय्यद कॉलनी करंजे नाका येथे महिलांनी पाण्याची भांडी मांडून रास्ता रोको केला. या भागाला तालुका पोलीस स्टेशन परिसरातील टाकीवरून पाणी पुरवठा होतो. मात्र पाणी प्राधिकरणामार्फत दिले जाते. या भागातील जलवाहिन्या बंद झाल्याने या परिसराला कमी दाबाने पाणी येते. सय्यद कॉलनीच्या पंधरा ते वीस महिलांनी रास्ता रोको करून आपला राग व्यक्त केला. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेविका लता पवार, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी घटनास्थळी येऊन महिलांची समजूत घातली. दसरा-दिवाळी तोंडावर असताना होणार्या पाणीटंचाईचा त्रागा महिलांनी व्यक्त केला. पाणी पुरवठा विभागाने तत्काळ या भागाची मुख्य सहा इंची लाईन खोदण्याचे काम हाती घेतले. दरम्यान, या भागाला टँकरने पाणी देण्याची पर्यायी सोय करण्यात आली. यापुढे मुबलक पाणी पुरवठा करण्यात येइल, असे आश्वासन देण्यात आले. या गोंधळ नाट्यात सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |