12:40pm | Jan 12, 2021 |
सिडनी: ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागणार्या टीम इंडियाने मालिकेत पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केला. दुसर्या सामन्यात विजय तर तिसरा सामना अनिर्णीत राखण्यात मिळवलेले यश यामुळे यजमान ऑस्ट्रेलियाला चांगला झटका बसला आहे. परंतू दुसर्या बाजूला टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखापतीने ग्रासले आहे. विहारी, जाडेजा यांच्यानंतर आला जसप्रीत बुमराह सुध्दा दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाच्या वेगाला आणखी एक ब्रेक मिळाला असून टीम इंडियाची चिंता वाढली आहे.
सिडनी कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना बुमराहाला एबडॉमिनल स्ट्रेनचा त्रास झाला होता. त्यामुळं अखेरच्या कसोटी सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे. 15 जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान ब्रिस्बेन येथे अखेरचा कसोटी सामना होणार आहे. त्यापूर्वीच बुमराहाला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघासमोर आणखी एक आव्हान उभं राहिलं आहे.
रिपोर्ट्सनुसार, तिसर्या कसोटी सामन्यानंतर दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचं स्कॅन करण्यात आलं. स्कॅन रिपोर्टमध्ये स्ट्रेन दिसून येत आहेत. भारतीय संघ व्यवस्थापन बुमराहच्या बाबतीत कोणताही धोका घेण्याच्या तयारीत नाही. भारतात होणार्या आगामी इंग्लंड दौर्याचा विचार करुन चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहाला आराम देण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या एका सुत्रानं पीटीआयला सांगितलं की, ‘जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीत क्षेत्ररक्षण करत असाताना एबडॉमिनल स्ट्रेन झालं होतं. त्यामुळे तो आता ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नाही. पण मायदेशात इंग्लंड विरोधात होणार्या कसोटी मालिकेसाठी बुमराह उपलब्ध असणार आहे.’
बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भारतीय वेगवान गोलंदाजीचं नेतृत्व करणार आहे. त्यासोबत नवदीप सैनीही असणार आहे. बुमराहच्या जागी नटराजनला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविंद्र जाडेजाच्या जागी शार्दुल ठाकूर तर बुमराहच्या जागी नटराजनला अंतिम 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |