02:54pm | Aug 03, 2020 |
अजित जगताप
सातारा : स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवणीचे अग्रणी व पत्री सरकारचे लढवय्या क्रांतीसिंह नाना पाटील यांची आज जयंती आहे. तसेच रक्षाबंधनाचा सण आहे. या दोन्हींचे औचित्य साधून आज क्रांतीसिंहांच्या रक्षणासाठी कॉ. वसंत आंबेकर यांच्या समवेत श्रीमती कमलाबाई आंबेकर यांनीही योगदान दिले होते. आज आंबेकर आजींच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
सातारा शहरातील रविवार पेठ या ठिकाणी सुमारे 70 ते 80 वर्षांपूर्वी कॉ. वसंत आंबेकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये स्वत:ला झोकून दिले. या चळवळीनिमित्त त्यांच्या सातार्यातील घरी क्रांतीसिंह नाना पाटील, बळवंतराव आंबुले, राऊसाहेब कळके, रामजी पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, दत्तू वाकळे, व्ही.एन.पाटील, नारायण माने, शेख बंडू इनामदार, बाबुजी पाटणकर, सोपानराव घोरपडे, बाबुराव जंगम, नाताजी लाड, जी.डी.बापू लाड, तुफान सेनेचे कॅप्टन राम लाड, इंदूताई पाटणकर, नागनाथ नायकवडी, राजमती पाटील असे क्रांतीकारक व बिळासी सत्याग्रह नेतेगण मंडळी येत होते. कम्युनिष्ठ पक्षाचा लाल बावटा घेवून काँगे्रेसला विरोध करणार्या या तरूणांपुढे काँग्रेसनेही हात टेकले होते. अशावेळी पोलीस यंत्रणा त्यांच्या मागावर होती. परंतु आंबेकरांच्या इमारतीतील तळघरात हे क्रांतीकारक आश्रय घेत होते. अशावेळी कॉ. कमलाबाई या शाकाहारी असल्यामुळे त्यांच्या हातचे जेवण क्रांतीसिंह आवर्जुन मागवून घेत होते. त्यांना धाकटी बहिण मानून ते आशीर्वाद देत होेते. पोलिस क्रांतीसिंहाच्या मागावर असताना अनेकदा आंबेकर दाम्पत्याचीही चौकशी करण्यात येत होती.
आज योगायोग म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती व रक्षाबंधनचा दिवस आहे. याच दिवशी आंबेकर आजींची भेट घेवून त्यांच्याकडून पुन्हा एकदा इतिहास जागृत करण्याचे काम त्यांचे नातू व पत्रकार सुजित आंबेकर यांच्यामुळे शक्य झालेले आहे. अनेक मान्यवर मंडळी प्रचार व सभेनिमित्त क्रांतीसिंह नाना पाटील यांचा उल्लेख आवर्जुन करतात. पण सध्या क्रांतीसिंहाच्या प्रतिमेचा विसर अनेकांना पडला आहे. अशावेळी 92 वर्षांच्या आंबेकर आजी त्यांच्या आठवणींना उजाळा देवून नव्या पिढीला इतिहासाची दखल घेण्यास भाग पाडतात. हे सातारकरांचे नशीब आहे. आज सत्तेत असणारांच्या पूर्वजांची आठवण काढल्या जातात. सत्ता गेल्यानंतर त्याचा विसर पडतो. अशा काळात आजींनी दिलेल्या आठवणींची शिदोरी कम्युनिष्ठ पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |