04:30pm | May 01, 2021 |
नवी दिल्ली: आयपीएलच्या 14 व्या हंगामात अतिशय खराब कामगिरी करणार्या सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्याच्या जागी आता न्यूझीलंडच्या केन विलियमसनकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
आतापर्यंत झालेल्या सहा लढतीत सनरायझर्सने फक्त 1 सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतक्यात ते सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. संघाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सनरायझर्स संघ व्यवस्थापनाने एक मोठा निर्णय घेतलाय. सनरायझर्स हैदराबादच्या सातत्याने होणार्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर कर्णधार बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हैदराबाद संघाने सोशल मीडियावर एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात केन या पुढील सामन्यात संघाचे नेतृत्व करेल असे म्हटले आहे. उद्या होणार्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढतीपासून केन विलियमसनकडे कर्णधारपद असेल. केनला कर्णधार करण्यात आले असले तरी डेव्हिड वॉर्नर संघात कायम असणार आहे असे संघाने म्हटले आहे.
आयपीएल 2021 मध्ये हैदराबाद संघाला पहिल्या सहा पैकी फक्त एका लढतीत विजय मिळवता आलाय. ते दोन गुणांसह आठव्या स्थानावर आहेत. संघाने कर्णधार बदलण्याबरोबरच पुढील सामन्यात टीममध्ये मोठे बदल करणार असल्याचे सांगितले आहे. विदेशी खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नरला संघाबाहेर बसावे लागू शकते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |