सातारा: सातारा शहर परिसरामध्ये चित्रीत झालेले मनं चांदणं झालंया... हे मराठी अल्बम साँग युट्यूबवर रिलीज झाला असून संगीतप्रेमींनी हे गाणे ऐकण्यासाठी युट्यूवर जाऊन पहावे व मनं चांदणं झालंया.. च्या तालावर बेधुंद होऊन त्या गाण्याचा आनंद लुटावा, असे आवाहन या अल्बमचे दिग्दर्शक तसेच एआयसीडब्ल्यूएचे (AICWA) सातारा जिल्हाध्यक्ष अमन खान यांनी केले आहे.
सातारा, वाई, महाबळेश्वर, पांचगणी या ठिकाणी हिंदी, मराठी तसेच दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांचे चित्रीकरण होते. सातारचा निसर्ग हा मुळातच चित्रपट निर्मितीसाठी पोषक असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चित्रपट मालिका तसेच विविध गीतांच्या आल्बमचे चित्रीकरण होत असते. याच प्रार्श्वभूमीवर फलटण येथील प्रतिथयश दिग्दर्शक व एआयसीडब्ल्यूएचे (AICWA) सातारा जिल्हाध्यक्ष अमन खान व विकास नांदले यांनी एकत्र येवून व्हाईट शॅडो फिल्म्स व ए के स्टुडिओच्या माध्यमातून मन चांदणं झालंया या गीताच्या अल्बमचे काम हाती घेतले होते. दरम्यान, या अल्बमचे चित्रीकरण तसेच एडिटींगचे काम पूर्ण झाल्याने हा अल्बम आता 27 जुलै रोजी यु ट्यूबवर प्रसिध्द करण्यात आला आहे.
शेंद्रे येथील पाटील वाडा, सातारा - कराड महामार्गावरील काही परिसर, ताथवडा (ता.फलटण) येथील परिसरात या अल्बमचे चित्रीकरण झाले आहे. तसेच या अल्बममधील गीतांचे लेखन ऋषिकेश मोरे व सागर भोसले यांनी केले असून प्राची सावंत व अनिकेत हुंबरे या उदयोन्मुख गायकांनी आपल्या आवाजाची जादू दाखवत पार्श्वगायन केले आहेत तर उदयोन्मुख व गुणी कलाकार म्हणून परिचित असलेल्या राज आंधळे व गिरीजा प्रभु हे या आल्बममध्ये मुख्य भुमिकेत आहेत. तर काजल गोसावी, शुभम लोखंडे, ऋतुजा सांडभोर यांनीही या अल्बमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.
सातारा व फलटण परिसरात चित्रीत झालेला हा अल्बम प्रेक्षकांना नक्कीच रूचेल असा विश्वास दिग्दर्शक अमन खान यांनी व्यक्त केला आहे. मन चांदणं झालंया या अल्बममधील गीते ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून दर्जेदार गीतांचा आनंद लुटा.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |