09:45pm | Jan 25, 2022 |
सातारा : साताऱ्यात नगरभूमापन कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार माजला आहे दस्त झालेल्या नोंदी सुद्धा जाणीपूर्वक टाळल्या जात असल्याच्या लोकांच्या तक्रारी वाढल्या असून प्रशासनाकडे याविषयाची तक्रार करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. या सर्व नोंदी आर्थिक तडजोडीच्या कारणासाठी टाळल्या जात असल्याच्या सुरस कहाण्या समोर येत आहेत.
भुमी अभिलेख अधिनियम प्रमाणे विहित कालावधीत अगदी 30 दिवसाच्या आत प्रक्रिया पूर्ण झालेल्या प्रस्तावांच्या नोंदी नगर भूमापन अधिकाऱ्याकडून प्रमाणित करणे आवश्यक असते. मात्र आर्थिक चळवळीच्या निमित्ताने ही प्रकरणे निकाली काढून नव्याने दाखल होणाऱ्या प्रकरणांचा कार्यालयात लागला आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यालयास भेट दिल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. माहुली येथील एका वयोवृद्ध माणसाला केवळ वारस नोंद घालण्यासाठी तब्बल सहा महिने हेलपाटे मारावे लागत आहेत. या प्रकरणावर कोणीही बोलायला तयार नाही. कोरोनाच्या भितीमुळे कार्यालयात कोणी यायला तयार नाही. अशा वेळी नगरभूमापन अधिकारी कोणाशी नोंद प्रलंबित असल्यास व एखाद्या प्रस्तावावर कोणाचा आक्षेप असल्यास त्यालाच घेऊन घ्या, असे दटावत आत एका प्रकरणांमध्ये नगर भूमापन अधिकाऱ्यांना नुकतीच घसघशीत बिदागी मिळाली. जी प्रकरणे बिदागी मधली असतात, त्यांना तातडीने हिरवा कंदील दिला जातो. मात्र ज्या प्रकरणांच्या तांत्रिक अडचणी असतात ती प्रकरणे सुद्धा सुनावणी घेऊन 45 दिवसांच्या आत निकाली काढणे आवश्यक असते. मात्र तसे न होता ही प्रकरणे तशीच पडून राहिल्याने नगर भूमापन कार्यालयात फायलींचा ढीग वाढला आहे.
याविषयाची तक्रार भुमी अधिक्षक कार्यालयाकडे होऊनही तेसुद्धा हातावर हात धरून शांत बसले आहेत. सामान्य माणूस नगर भूमापन कार्यालयात हेलपाटे मारून वैतागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 56 प्रकरणे अद्यापही प्रलंबित असल्याने अर्ज धारकांना फुकटचा मनस्ताप सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे या परिस्थितीचा फायदा उकळणारेही सोकावले आहेत. असेच काही पोपटपंची करणारे चमको बहाद्दर कार्यालयात पोहोचले आणि नगर भूमापन अधिकाऱ्याला दटावणी करू लागले. नगर भूमापन कार्यालयात सुरु असलेल्या बेबंद कारभाराविषयी महसूल विभागाकडे याचा सविस्तर अहवाल जाणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सातारकर करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |