10:50pm | Oct 16, 2020 |
सातारा : दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वनविभागातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. यावर्षी कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थिती मुळे शाळा महाविद्यालय तसेच गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करणे शक्य नसल्याने ऑनलाईन वेबिनार, क्षेत्र भ्रमंती, अभ्यास सहल , ग्रामस्थ समुपदेशन, औषधी वनस्पती लागवड विषयक चर्चाचे आयोजन अशा स्वरूपात साजरा करण्यात आला. परिक्षेत्रातील उचाट व दरे या गावामध्ये बांबू लागवडीस प्रोत्साहन म्हणून स्थानिक बांबू प्रजातीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
दि.२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती व वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र कार्यालय व परिसर, वेळे कुटी, मेट इंदोली संकुल, रघुवीर घाट येथे श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. वलवण येथील निवासी शाळेत दि. ३ ऑक्टोबर रोजी मानव वन्यजीव संघर्ष व अन्न साखळीतील वन्यजीवांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळे कुटी येथे वृक्षारोपण करण्यात आले. वेळे (ढेण) येथील ग्रामस्थासोबत चर्चा करून वन्यप्राण्याकडुन होणारे पिक नुकसान व पशुधन हानीची भरपाई त्वरीत मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया व कागदपत्रे याविषयी समुपदेशन केले.
दि.५ ऑक्टोबर रोजी परिक्षेत्रातील कर्मचारी यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर कार्यालयाद्वारे आयोजित वेबिनार मधे सहभाग नोंदविला. मुनावळे ग्रामस्थांशी चर्चा करून औषधी वनस्पती लागवड प्रक्रिया, त्यामधील संधी व फायदे याविषयी समुपदेशन करण्यात आले. तसेच बामणोली व दापोली परिक्षेत्रातील कर्मचारी, चिपळूणचे निसर्ग प्रेमी व अभ्यासक निलेश बापट व कोकरे यांच्या समवेत दुर्ग चकदेव येथे अभ्यास भ्रमंती करून माहिती घेतली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |