09:15pm | Sep 23, 2021 |
सातारा : जेव्हा कोरोना महामारीचा कहर सुरु होता तेव्हा सातारा पालिकेने सातारकरांसाठी साधं एक आयसोलेशन सेंटर सुरु केलं नाही. आता कोरोना रुग्ण कमी होत असताना आणि लस सर्वत्र उपलब्ध असताना सत्ताधाऱ्यांनी शहरात 'मोफत लसीकरण' अशी बॅनरबाजी सुरु केली आहे. एकीकडे डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांची 'शो बाजी' सुरु आहे. हा बैल गेला अन झोपा केला कारभार कधी सुधारणार, असा वास्तववादी सवाल विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मोने यांनी म्हटले आहे की, सातारा शहरात कोरोनाचे थैमान सुरु होते, त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. लस मिळत नसल्याने अनेकांनी स्वखर्चाने लस घेतली. कोरोनामुळे हैराण झालेले सातारकर मोठ्या आशेने सत्ताधाऱ्यांकडे पाहत होते पण, पालिकेत कमिशन, टक्केवारी आणि टेंडर यातच सत्ताधारी गुरफटले होते. आता कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. जिल्हा परिषदेमार्फत शहरात लसीकरण कॅम्प घेतले जात आहेत मात्र त्यातही 'शो बाजी' करून सत्ताधाऱ्यांनी बॅनरबाजी सुरु केली आहे. लसीकरण घेतले जात आहे हि बाब चांगलीच आहे. उशिरा का होईना शहाणपण सुचले याबद्दल सत्ताधाऱ्यांचे आभार मानले पाहिजेत.
सत्ताधाऱ्यांचा बैल गेला अन झोपा केला कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसला. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असून आता डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. यावर पालिकेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे, कचरा आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी कोरोना लसीकरणाच्या बॅनरबाजीत धन्यता मानत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सातारकरांना नेहमीच बसला आहे आणि आताही बसत आहे. लसीकरण कॅम्प आणि तुमची बॅनरबाजी सुरु राहू द्या पण, डेंग्यू पासून सातारकरांना वाचवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा, असे मोने यांनी म्हटले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |